गिरगाव येथे एका हमालाने दुसऱ्या हमालाच्या डोक्यात फरशीने घाव घालून खून केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी आरोपी गणेश शिवनकर याला अटक केली.

हेही वाचा – कळव्याच्या सहाय्यक आयुक्तांनी घेतले बेकायदा बांधकामधारकाकडून २० लाख रुपये; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

हेही वाचा – BBC Documentary: “मनसेने आम्हाला शहाणपण शिकवू नये”, शरद पवारांचं नाव घेत आशिष शेलारांचं मनसेवर टीकास्र!

गिरगाव परिसरातील मोती टाॅकीजजवळील अलंकार जंक्शन येथे शुक्रवारी दुपारी हमाल संदीप सोनावणे (३५) आणि गणेश शिवनकर (३२) याच्यात वाद झाला होता. त्यानंतर काही वेळाने संदीप झोपलेला असताना, गणेशने त्याच्या डोक्यावर फरशीने घाव घातला. त्यामुळे संदीपचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गणेश मुंबईतून पळून जाण्याच्या तयारीत होता. गणेशचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके प्रत्येक रेल्वे स्थानक, बस थांब्यावर पाठवण्यात आली होती. तसेच व्ही.पी. रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस आरोपीचा शोध घेत होते. पोलिसांनी नळबाजार परिसरातून गणेशला अटक केली, अशी माहिती व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.