मुंबई : महिलेच्या मोबाइल क्रमांकावर अश्लील छायाचित्रे पाठवून तिला शिवीगाळ करणाऱ्या एका आरोपीला पंतनगर पोलिसांनी गुजरात येथून अटक केली आहे. दिव्यकुमार पांचाळ (वय २८) असे या आरोपीचे नाव असून पोलीस त्याच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत. घाटकोपर पूर्व परिसरात पीडित महिला राहात असून तिला काही दिवसांपासून अनोळखी मोबाइल क्रमांकावरून काही अश्लील छायाचित्रे येत होती. सुरूवातीला या महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर अनोळखी इसमाने फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ देखील केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अखेर महिलेने पंतनगर पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता. दूरध्वनी गुजरातमधील अहमदाबाद येथून आल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी गुजरात येथे जाऊन शुक्रवारी या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने अशाच प्रकारे अनेक महिलांना फोन करून शिवीगाळ केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करत आहेत.