लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: बनावट एटीएम कार्ड तयार करून बँकेतील रक्कम लंपास करणाऱ्या एका सराईत आरोपीला घाटकोपर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट एटीएम कार्ड, सिमकार्ड, मोबाइल आणि काही बँकांची कागदपत्रे हस्तगत केली.
घाटकोपरच्या भटवाडी परिसरात राहणारे बळीराम घाडगे यांनी तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात ७३ हजार रुपये जमा केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांच्या बँक खात्यातून ही रक्कम काढण्यात आली. याबाबत त्यांनी तत्काळ घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या तपासात दिल्लीच्या एका एटीएममधून ही रक्कम काढण्यात आल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तत्काळ संबंधित बँकेशी संपर्क करून पैसे काढणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळविली.
प्रवीण सिंह (३१) या आरोपीने बनावट एटीएम कार्डच्या आधारे ही रक्कम काढल्याचे उघड झाले. पोलिसांनी प्रवीणच्या मोबाइलचा माग घेऊन त्याला दिल्लीतून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून वेगवेगळ्या नावाची अनेक बनावट एटीएम कार्ड, सात मोबाइल आणि अनेक सिमकार्ड हस्तगत केली.