मानसी जोशी

दहा दिवसांपूर्वी मुंबईत ‘बॉम्बे रनिंग’ ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ठराविक अंतर पार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. स्पर्धकांनी ते पारही केले आणि ते पूर्ण केल्याची वेळही नोंदवली. पण यातील सारे सोपस्कार ‘आभासी पद्धती’नुसार पार पडले. म्हणजे दहा किलोमीटर धावण्याचे आव्हान प्रत्येक स्पर्धकाने स्वीकारले आणि मुंबईतील चेंबूर, शिवाजी पार्क, मरीन ड्राइव्ह, वरळी, वांद्रे आणि जुहू या भागांत ही धाव पूर्ण केली आणि बक्षीसही मिळवली.

Sewri-Worli elevated road work will be speed up
शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम घेणार वेग
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Lakhs of students perform Surya Namaskar Activities on occasion of Rath Saptami
लाखो विद्यार्थ्यांनी घातले सुर्यनमस्कार; रथसप्तमीनिमित्त उपक्रम, शेकडो शाळा महाविद्यालयांचा सहभाग
Navi Mumbai Metro update Belapur Pendhar line Metro speed
नवी मुंबई मेट्रो सुसाट, लवकरच बेलापूर-पेणधर मेट्रोची ताशी ६० प्रति किलोमीटर वेगाने धाव
Will AAP win Delhi Assembly elections 2025 for fourth time or BJP will get chance after 31 years
‘आप’ चौथ्यांदा, की… भाजपला ३१ वर्षांनी संधी?
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
Shankaracharya Abhinav Shankar Bharti statement that meat consumption is permitted in religious rituals
लोक लौकिक: योग आणि भोग, की दोन्हीही?
ISRO successfully launches communication satellite NVS 02
‘इस्रो’चे शतकी उड्डाण

करोनाकाळात मर्यादांमुळे मॅरेथॉन तसेच इतर स्पर्धा आयोजित करण्यास बंधने आहेत. त्यात संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने एकत्र येण्यावर मर्यादा असल्याने एकाच ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणे शक्य नाही. त्यामुळे आयोजकांनी ‘व्हर्च्युअल मॅरेथॉन’ आयोजित केली. ‘बॉम्बे रनिंग’मधील सहभागी धावपटूंसाठी रोज पाच वा दहा किलोमीटर धावण्याचे लक्ष्य होते. ही स्पर्धा दहा दिवसांसाठी होती. अर्थात या कालावधीत प्रत्येक स्पर्धकाला ५० वा १०० किलोमीटर अंतर त्यांच्याच परिसरात धावून पूर्ण करायचे होते.

या स्पर्धेत विविध गटात सहभागी होत स्पर्धकांनी ‘अ‍ॅप’द्वारे लक्ष्य पूर्ण केल्याची वेळ आयोजकांकडे नोंदवली. काहींनी बक्षिसेही पटकावली. करोनाकाळात लादलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या. आता अशा स्पर्धाचे माध्यमातून स्पर्धकांचे मनोबल उंचावण्यास मदत झाल्याचे  मत ‘बॉम्बे रनिंग’ या समूहाचे प्रमुख दीपक ओबेरॉय यांनी व्यक्त केले.

दोन महिन्यांपूर्वी युनायटेड स्पोर्टसच्या वतीने आभासी पद्धतीने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मॅरेथॉनला धावपटूंचा उत्तम प्रतिसाद लाभला. यात काही स्पर्धक घर, गच्ची तसेच मैदानात धावले.

या वेळी सिद्धार्थ गुप्ता म्हणाले, की  एकत्र येता येत नसेल तर अशा क्रीडा उपक्रमांमुळे स्पर्धकांचा व्यायाम होतो आणि त्यांच्यात सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे अशा स्पर्धातील सहभागही वाढला आहे. रवी उईके या हौशी सायकलपटूने भारतीय वायुदलाच्या क्रीडा उपक्रमात भाग घेतला आहे. यात स्पर्धकांना १० किलोमीटर याप्रमाणे, ३० दिवसांत ३०० किमी अंतर सायकलने पार करायचे आहे. माझे २० दिवसांत २०० किलोमीटर पूर्ण आहेत.  १०० किलोमीटर अंतर शिल्लक आहेत.

लंडन मॅरेथॉनमध्ये ठाण्यातील स्पर्धक

ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवडय़ात जगातील महत्त्वाची मानली जाणारी लंडन मॅरेथॉन पार पडली.  ठाण्यातील डॉ. महेश बेडेकरसह सहा हौशी धावपटू या मॅरेथॉनमध्ये व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले होते. यात बेडेकरांनी ४२.२ किलोमीटर अंतर ३ तास ३३ मिनिटात पार केले. दरवर्षी एक तरी मॅरेथॉन धावणाऱ्या बेडेकरांनी यंदा करोनामुळे ठाण्यातच धावण्याचा निर्णय घेतला. या अनुभवाबद्दल त्यांनी सांगतिले की,‘व्हर्च्युअल मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा अनुभव वेगळा होता. ठाण्यातील बराचसा भाग उंचसखल असल्याने तेथे धावणे हे एक प्रकारचे आव्हान होते. आदल्या दिवशी पाऊस पडून गेल्याने वातावरण धावण्यास अनुकूल होते. लंडन येथील प्रमाणवेळेनुसार पहाटे ४.३० वाजता ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथून सुरूवात केली.

Story img Loader