शेजारी महिलेशी असलेल्या भांडणातून तिच्या चार वर्षीय मुलावर अ‍ॅसिड टाकल्याची घटना पवईतील फिल्टर पाडा येथे घडली आहे. या प्रकरणी आशा गव्हाणे या महिलेस अटक करण्यात आली आहे. आयुष मोरे असे जखमी मुलाचे नाव आहे.
आशा गव्हाणे या फिल्टर पाडा येथील फुले नगरमध्ये राहतात. त्यांचे शेजारी राहणाऱ्या मोरे कुटुंबाशी भांडण होते. काल रात्री आशा यांचे आयुषच्या आईशी पुन्हा एकदा भांडण झाले. त्यावेळी आयुष घरासमोरच खेळत होता. भांडणावेळी रागाच्या भरात आशा गव्हाणे यांनी आयुषच्या अंगावर फिनाईल टाकले. यामुळे आयुषच्या डाव्या डोळय़ाला इजा झाली असून चेहऱ्यावरही जखम झाली आहे. आयुषला साकीनाका येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी गुरुवारी आशा गव्हाणे या महिलेस अटक करण्यात आली व पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी सांगितले.   

Story img Loader