मुंबई : कुख्यात गुंड छोटा राजन याच्यासह चार आरोपींची दुहेरी हत्याकांडातून विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी निर्दोष सुटका केली. जे. जे. येथील सिग्नलजवळील २००९ मध्ये गोळीबारप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने हा निकाल दिला. याप्रकरणी राजन याची निर्दोष सुटका झाली असली तरी त्याच्यावर इतर अनेक खटले सुरू असल्याने तो कारागृहातच राहणार आहे. आतापर्यंत त्याला पत्रकार जे. डे हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. राजन आणि अन्य आरोपींविरोधात पुरावे सिद्ध करण्यात पोलिसांना पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

त्यामुळेच पुराव्याअभावी राजन आणि अन्य दोन आरोपींची निर्दोष सुटका करत असल्याचे विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी निकाल देताना नमूद केले. तसेच या दुहेरी हत्याकाडांचा कट राजनने रचल्याचे सिद्ध होऊ शकलेले नाही, असेही न्यायालयाने निकालात नोंदवले. राजन याच्यासह मोहम्मद अली शेख, उमेद शेख आणि प्रणय राणे या तिघांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली.

Supreme Court Verdict on Madrasa Education Act
UP Madarsa Act: मदरसा शिक्षण मंडळ कायदा घटनात्मक; सर्वोच्च न्यायालयाचा योगी आदित्यनाथ सरकारला झटका, उच्च न्यायालयाचा निकाल फेटाळला
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
Over 150 prisoners in the state will be released from jail
राज्यातील दीडशेवर कैद्यांची होणार कारागृहातून सुटका; नागपूर आणि पुण्यातील…
Man Assaults Woman In Greater Noida
VIDEO : केस पकडले, कानशीलात लगावल्या; तरुणाची भररस्त्यात मैत्रिणीला मारहाण
police registered case against restaurant waiter for giving impure water
डोंबिवली पलावातील हॉलमधील सेवकावर अशुध्द पाणी पिण्यास दिले म्हणून गुन्हा
Police sub-inspector arrested for taking bribe to avoid arrest
अटक न करण्यासाठी लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड
Financial and Cyber Crimes Branch reported that Deepak Sakharam Kulkarnis seized assets remain unreleased
जप्त केलेली कोणत्याही मालमत्ता मुक्त करण्यात आलेली नाही, डीएसके प्रकरणात आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेची न्यायालयास माहिती

 जुलै २००९ मध्ये साहिद गुलाम हुसैन ऊर्फ छोटे मिया याच्यावर दक्षिण मुंबईतील नागपाडा भागात पदपथावर अज्ञातांनी गोळय़ा झाडल्या होत्या. घटनास्थळावरून पळून जाताना हल्लेखोरांनी अन्य तिघांवरही गोळय़ा झाडल्या होत्या. या गोळीबारात छोटे मियाँ आणि सईद अर्शद यांचा मृत्यू झाला. तपासादरम्यान, पोलिसांनी राणे याला अटक केली, त्याने चौकशीत राजनसह अन्य आरोपींची नावे आणि भूमिका उघड केल्याचा पोलिसांचा आरोप होता. मात्र राजनसह अन्य आरोपींविरोधात असलेला आरोप पोलीस सिद्ध करू शकले नाहीत, असे नमूद करून न्यायालयाने चौघांची निर्दोष सुटका केली. इंडोनेशियातील बाली येथून राजन याला २०१५ मध्ये हद्दपार करण्यात आल्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले. तेव्हापासून राजन हा दिल्ली येथील तिहार तुरुंगात आहे. त्याच्याविरोधातील सगळे खटले हे मुंबईतील सीबीआय न्यायालयात सुरू आहेत.

पत्रकाराची साक्ष विश्वासार्ह नाही

या खटल्यात एका पत्रकारानेही साक्ष दिली होती. या पत्रकाराने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबानुसार, राजन याने त्याला एक मुलाखत दिली होती, त्यात त्याने गोळीबाराचे आदेश दिल्याचे कथितपणे म्हटले होते. परंतु राजन याने त्याला दिलेल्या मुलाखतीची ध्वनिफीत त्याच्याकडे नाही आणि तो राजनचा आवाज ओळखू शकत नाही, अशी साक्ष या पत्रकाराने न्यायालयात दिली होती. या पत्रकाराचे म्हणणे विश्वासार्ह नसल्याचे विशेष न्यायालयाने म्हटले. प्रकरणात प्रत्यक्षदर्शी उपलब्ध असतानाही आरोपींची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेला विलंब करण्यात आला.