मुंबई : निर्धारित कालावधीमध्ये करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. विहित मुदतीत त्यांनी करभरणा न केल्यास मुंबई पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधितांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाईल, असे या नोटिशीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्यातर्फे मुंबई शहर आणि उपनगरांमधील मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती तसेच आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये यासाठी साप्ताहिक सुट्टी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व विभागांमध्ये कर भरण्याची सोय करण्यात आली आहे. काही मोठ्या थकबाकीदारांना वेळोवेळी सूचना देऊनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. नोटीसप्राप्त मालमत्ताधारकांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी तत्काळ करभरणा करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा – विखे-पाटील यांच्या माफीनाम्यानंतरही भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी कायम

हेही वाचा – शहांनी बडदास्त ठेवलेले उदयनराजे आता भेटीसाठीही तरसले!

‘टॉप टेन’ थकबाकीदारांची यादी

१) एल अॅण्ड टी स्कॉमी इंजिनीअरिंग (एफ उत्तर विभाग) – ८८ कोटी ६३ लाख ७८ हजार ६७९ रुपये

२) रघुवंशी मिल्स (जी दक्षिण विभाग) – ७१ कोटी २३ लाख ६५ हजार ८५२ रुपये

३) एचडीआयएल (एच पूर्व) – ५३ कोटी १२ लाख ३९ हजार ९५३ रुपये

४) पोपटलाल जमनालाल, सी ब्रिझ बिल्डिंग ६ ते १५ मजले (जी दक्षिण)- ४७ कोटी ९९ लाख ८४ हजार ७६६ रुपये

५) एचडीआयएल (के पूर्व) – ४४ कोटी ०५ लाख ५४ हजार ३५ रुपये

६) रघुवंशी मिल्स (जी दक्षिण विभाग) – १७ कोटी ८७ लाख ६१ हजार ५६५ रुपये

७) सुभदा गृहनिर्माण संस्था (जी दक्षिण)- १६ कोटी ८४ लाख ७५ हजार ७०० रुपये

८) नॉव्हेल्टी सिनेमा (डी विभाग)- १६ कोटी ०१ लाख ८० हजार ६३ रुपये

९) ओमकार डेव्हलपर्स प्रा. लि. (जी दक्षिण विभाग)- १२ कोटी २१ लाख ३२ हजार १७३ रुपये

१०) गोल्डन टोबॅको कंपनी प्रा. लि (के दक्षिण विभाग)- ०८ कोटी ६७ लाख ८१ हजार ४८८ रुपये

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against big defaulters who do not pay property tax warning of mumbai municipal corporation mumbai print news ssb