मुंबई : बनावट पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

परदेशात बनावट पदवी प्रमाणपत्र घेतलेल्या १२३ विद्यार्थ्यांचा केंद्रीय अन्वेषण विभागाने २०२२-२३ मध्ये शोध घेतला होता. यामध्ये राज्यातील ३ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. केंद्र सरकारने याबाबत नियमात बदल केला असून चीन, न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन या देशातून वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची परीक्षा देण्याची अट नाही. मात्र, अन्य देशातून पदवी प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे आवश्यक आहे. त्यांनतर त्यांना देशात वैद्यकीय व्यवसाय करता येईल, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

Bhushan Gagrani inaugurated the 'Home Away From Home' building
बीएमटी केंद्रातील रुग्ण, पालकांच्या निवासासाठी स्वतंत्र इमारत, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे हस्ते झाले लोकार्पण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
hair loss reasons loksatta news
टक्कल, केसगळतीचे कारण काय? चेन्नई, दिल्लीतील पथक शेगावात
unregistered doctors , Maharashtra Medical Council,
नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा निर्णय
Mumbai municipal corporation latest news in marathi
मुंबई महानगरपालिकेकडून औषध वितरकांची १२० कोटींची देयके थकीत, देयके मंजूर न झाल्यास १३ जानेवारीपासून पुरवठा बंद करण्याचा इशारा
Mahatma Phule Jan Arogya Yojana
‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’तील रुग्णालयांची स्वतंत्र पथकामार्फत चौकशी!
Chief Minister Devendra Fadnavis directs to evaluate the health system Mumbai news
आरोग्य व्यवस्थेचे मूल्यमापन करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
Assistant Commissioner shreenivas dangat loses job due to third child
पिंपरी : तिसऱ्या अपत्यामुळे सहायक आयुक्ताने गमावली नोकरी

हेही वाचा – मुंबई : शुन्य वैद्यकीय चिठ्ठी योजनेला १५ जानेवारीचा मुहूर्त

बोगस पदवी प्रमाणपत्र घेऊन वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना शोधून कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांना सातत्याने बोगस डॉक्टरचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : माझगाव यार्डाजवळ रुळावरून इंजिन घसरले, अप जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना नोंदणी बंधनकारक

वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र वैद्यकीय आयोग संस्थेत नोंदणी करणे बंधनकारक आहे. राज्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे. परदेशातून वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय वैद्यक विज्ञान परिषद व महाराष्ट्र वैद्यकीय आयोग या दोन्ही संस्थांमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच एक वर्षाची वैद्यकीय क्षेत्रात आंतरवासिता (इंटर्नशीप) करणेही बंधनकारक आहे.

Story img Loader