मुंबई: महादेव बुक बेटिग अ‍ॅपचा संचालक मृगांक मिश्राला मुंबई विमानतळावरून रविवारी अटक करण्यात आली. मिश्रा दुबईतून अ‍ॅपचे कामकाज चालवत होता. त्याच्याविरोधात लुक आऊट सक्र्युलर जारी करण्यात आले होते. त्याच्या आधारे दुबईवरून मुंबई विमानतळावर आल्यावर आरोपीला पकडण्यात आले. राजस्थान पोलिसांना त्याचा ताबा देण्यात आला आहे. मिश्राच्या अटकेची माहिती सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) देण्यात आली आहे. आरोपीवर ९० बनावट बँक खाते बनवल्याचा आरोप आहे. त्यात दोन हजार कोटींचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

मिश्रा हा महादेव अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी आहे. मिश्रा मूळचा मध्य प्रदशातील रतलान येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो दुबईमध्ये लपला होता. तेथून तो इतर आरोपींच्या मदतीने महादेव बुक बेटिंग अ‍ॅप चालवत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. राजस्थानमधील प्रतापगड पोलीस ठाण्यातही बनावट नावाने बँक खाती उघडून कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आऊट सक्र्युलर (एलओसी) जारी केले होते. त्या एलओसीच्या आधारावर दुबईवरून मुंबई विमानतळावर आल्यावर त्याला रविवारी थांबवण्यात आले. त्यानंतर राजस्थान पोलिसांना त्याचा ताबा देण्यात आला. ईडीमध्येही मिश्राचा शोध घेत असल्यामुळे या अटकेबाबतची माहिती राजस्थान पोलिसांकडून ईडीला देण्यात आली. याप्रकरणी आरोपी २१ ऑक्टोबपर्यंत राजस्थान पोलिसांच्या कोठडीत आहे. तेथून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानतंर ईडी मिश्राचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
Two rickshaws collided after minor driver lost control of tempo
अल्पवयीन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना धडक
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
Tadoba online booking scam officials questioned three months ago
ताडोबा ऑनलाईन बुकींग घोटाळा, तीन महिन्यांपूर्वीच अधिकाऱ्यांची चौकशी
Three months jail developers , Mumbai ,
मुंबईतील तीन विकासकांना तीन महिन्यांचा कारावास, महारेराच्या आदेशाचे पालन न केल्याने महारेरा अपलीय न्यायाधीकरणाचा निर्णय
Fast paced concreting on Madh Marve road in Malad is causing traffic congection
मढ मार्वे मार्गावरील रस्ते कामात नियोजनाचा अभाव, वाहतूक कोंडीमुळे पाऊण तासाच्या प्रवासासाठी अडीच तास प्रतीक्षा

हेही वाचा >>>न्यायालयाने मार्गदर्शन केल्यास दुरुस्ती!  वेळापत्रकाबाबत राहुल नार्वेकर यांची भूमिका

ईडीने मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अ‍ॅपसंबंधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले होते. याप्रकरणी सुमारे ४१७ कोटी रुपये किमतीची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री हुमा कुरेशी, श्रद्धा कपूर यांच्यासह  १२ हून अधिक तारांकित कलाकार, खेळांडू या अॅपच्या समाजमाध्यांवर जाहिरात केली आहे. त्याप्रकरणी रणबीर कपूर, हुमा कुरेशी, श्रद्धा कपूर यांना ईडीने समन्स पाठवले आहे.

बनावट खात्यांमध्ये दोन हजार कोटींचे व्यवहार

राजस्थान पोलिसांनी ९० हून अधिक बनावट बँक खात्यांची माहिती मिळवली आहे. या बनावट खात्यांचा वापर सट्टय़ाच्या रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी करण्यात आल्याचा राजस्थान पोलिसांना संशय आहे. या बँक खात्यांबाबतची माहिती घेतली असता त्यात दोन हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.  त्यातील ६८ बँक खात्यांमध्ये तीन कोटी ८६ लाख २९ हजार रुपये गोठवण्यात आले आहेत. याप्रकरणी यापूर्वी राजस्थान पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून २० हून अधिक डेबिट व क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आली होती. ही बँक खाती सट्टेबाजी अॅप व्यवहारांसाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे.

Story img Loader