मुंबई: राज्यात विशेषत: मुंबईत वाहनचालक  वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवित आहेत. बहुसंख्य वाहनचालक एकदिशा मार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालवून नियम पायदळी तुडवताना दिसतात. या बेशिस्त मंडळींमुळे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यानाही धोका निर्माण होत आहे. बेशिस्त वाहनचालकांच्या यादीत मुंंबईकर आघाडीवर असून जानेवारी २०२० ते जून २०२२ या कालावधीत विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याबद्दल एक लाख २९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकदिशा मार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. असे प्रकार अनेक ठिकाणी सर्रास घडतात. मात्र या वाहनचालकांवर कारवाई केल्यानंतरही हे प्रकार रोखण्यात अपयश येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये या प्रकाराची दखल घेतली होती. वाहतुकीचा हा नियम मोडणाऱ्या चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.

नक्की वाचा >>Maharashtra News Live : महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची जोरदार हजेरी, धरणात आता समाधानकारक जलसाठा

मुंबईत जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात वाहतुकीचा नियम मोडल्याची  ३३ हजार २८२ प्रकरणे झाली होती. मात्र वाहनचालकांना कारवाईची भिती नसल्याचे निदर्शनास आले आहे. वाहतूक पोलीस कारवाई करीतच आहेत. २०२१ मध्ये ६४ हजार ७५९ आणि जून २०२२ पर्यंत एक हजार ९८८ चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. विरुद्ध दिशेने वाहन चलविणाऱ्या चालकांकडून एक हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येतो.

ठाणे, नवी मुंबईत नियम धाब्यावर

ठाणे, नवी मुंबईतही वाहनचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवित आहेत.  विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येते. २०२१ मध्ये ठाणे शहरात २२ हजार १०३ आणि नवी मुंबईत आठ हजार ७२१, तर २०२२ मध्ये ठाण्यात ५९४ आणि नवी मुंबईत २००६ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईत सहा कोटी रुपये दंड वसूल

मुंबईत विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांकडून २०२१ पासून सहा कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.  ठाण्यात दोन कोटी रुपयांहून, तर नवी मुंबईत ८६ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.