मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सर्व २६ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंर्तगत म्हणजेच मोक्काअंतर्गत कारवाई आली आहे. तसेच, याप्रकरणी लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईसह तिघांचा सहभाग उघड झाला असून त्यांनाही याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी पंजाबमधून अटक करण्यात आलेला सुजीत सुशील सिंह हा कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे अनमोल बिष्णोईला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. अनमोल बिष्णोईने यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार घडवून आणला होता. सिंहच्या सांगण्यावरून या प्रकरणातील अटक आरोपी नितीन सप्रे व राम कनोजिया यांनी बाबा सिद्दिकी यांचे घर व आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाची पाहणी केली होती.

हेही वाचा…वसई विरार मॅरेथॉनसाठी विशेष लोकल

सुजीत सिंह याने परदेशातील गुंडासोबत संपर्क साधला होता. सिंह विविध समाज माध्यमातून अनेक खात्यांवर संवाद साधत होता. पंजाब पोलीस व मुंबई पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सिंहला लुधियानातून पकडण्यात आले होते. सिंह बाबा सिद्दिकीला मारण्याच्या कटात सहभागी होता. याप्रकरणी आतापर्यंत पाच पिस्तुल जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या मते, सिंहला बाबा सिद्दिकीच्या हत्या कटाची माहिती होती आणि तो अनमोल बिश्नोईच्या संपर्कात होता. त्याने इतर आरोपींना पैसे पुरवले आणि शस्त्रांचा पुरवठा करण्यातही सहभागी होता.

हेही वाचा…मेट्रो २ ब मधील बाॅलीवूड थीम पार्कला काँग्रेसचा विरोध, पैशांची उधळपट्टी असल्याचे सांगत एमएमआरडीएला पाठविले पत्र

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारे गुरनैल सिंह, धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम तसेच हरिशकुमार निशाद (२६), नितीन सप्रे (३२), राम कनोजिया (४३), संभाजी पारधी (४४), चेतन पारधी (२७), प्रदीप ठोंबरे (३७), भगवंतसिंग ओमसिंग (३२), अमित कुमार (२९), रुपेश मोहोळ (२२), करण साळवे (१९), शिवम कोहाड (२०) आणि सुजित सिंग (३२) यांच्या सह एकूण २६ आरोपीना अटक केली आहे. याशिवाय, फरार आरोपी झिशान अख्तर आणि शुभम लोणकर यांचाही सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याचे उघड झाले असून त्यांचाही शोध सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action has taken against 26 accused in baba siddiquis murder under moka mumbai print news sud 02