मुंबई : अनधिकृतरित्या सुरू असलेल्या चेंबूरमधील एका हुक्का पार्लरवर गुरुवारी समाजसेवा शाखेने छापा घातला. यावेळी समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी ४० जणांना ताब्यात घेतले असून त्यांना टिळकनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

घाटकोपर राजावाडी रुग्णालय परिसरात अनधिकृतरित्या ‘किक कॅफे’ हा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली. समाजसेवा शाखेने गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास ‘किक कॅफे’वर छापा घातला. यावेळी येथे अनेक तरुण आणि तरुणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत असल्याचे आढळून आले. समाजसेवा शाखेने हुक्का पार्लरमधील कर्मचाऱ्यांसह एकूण ४० जणांना ताब्यात घेतले. पोलिसानी या कॅफेतून तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत केले. याबाबत टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?