मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मंगळवारी तिसऱ्या दिवशी एकूण चार अनधिकृत पक्ष कार्यालये तोडण्यात आली, तर एक पक्ष कार्यालय संबंधितांनी
स्वत:हून काढून घेतले. दहा दिवसात शहरातील २२ अनधिकृत कार्यालये जमीनदोस्त करण्याचे आदेश होते. त्यापैकी २१ कार्यालयांवर तीन दिवसात महापालिकेने कारवाई केली आहे.
सकाळी पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या या कारवाईत वर्तकनगरमधील गांधीनगर, स्वामी विवेकानंदनगर, लोकमान्यनगर आणि कळवा खारीगांव येथील
शिवसेनेच्या शाखांवर कारवाई करण्यात आली. मुंब्रा प्रभाग समितीतंर्गत शीळ येथील शिवसेनेचे कार्यालय संबंधितांनी स्वत:हून हटविले. उपायुक्त प्रकाश बोरसे,
श्रीकांत सरमोकदम, दीपक चव्हाण आदींनी या कारवाईत भाग घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा