दूधभेसळ करत असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील महानंद डेअरीसह राज्यातील सहा कंपन्यांवर कारवाई केली असून पाच दूध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दूधभेसळीला आळा घालण्यासाठी जळगाव, कोल्हापूरनंतर मुंबई व ठाणे विभागात ९ डिसेंबर रोजी मोहीम आखण्यात आली. उत्पादक, पुरवठादार व किरकोळ व्यापारी या तीनही स्तरांवर ८१ दुधाचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले. त्या प्रकरणी सहा नमुने खाण्यास असुरक्षित असल्याचे घोषित झाले. या सहा प्रकरणांत मुंबईतील महानंद डेअरी, बोईसर येथील गुजरात  को. ऑप. मिल्क फेडरेशन, बोईसर येथील वसुंधरा डेअरी, खोपोलीमधील शासकीय दूध योजना, तुर्भे येथील कोल्हापूर जिल्हा सहकारी उत्पादक संघ आणि सांगली येथील बी. जे. चितळे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पाच विक्रेत्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दूधभेसळीसंदर्भात २६५९२३४६, २६५९२३६५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

Story img Loader