राज्यातील महामार्ग सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या काही महिन्यांत अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यामुळे आता राज्य वाहतूक पोलिसांनी महामार्गावर अडलेल्या प्रवाशांना आवश्यक ती सर्व मदत कमी वेळेत उपलब्ध व्हावी, या दिशेने कृती योजना तयार केली आहे. यासाठी संबंधितांनी फक्त हेल्पलाईनवर वाहतूक पोलिसांना कळविणे आवश्यक आहे. सध्या अध्र्या तासांत ही मदत पोहोचत आहे. मात्र तो वेळ आणखी कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त महासंचालक विजय कांबळे यांनी सांगितले.  राज्य वाहतूक पोलिसांच्या वेबसाईटवर महामार्गाचा नकाशा आहे. महामार्गावरील त्रुटींबाबतही प्रवासी हेल्पलाईनवर तक्रारी करू शकतात, असेही कांबळे यांनी सांगितले.
हेल्पलाईन – ०२२-२२६२६६५५/ ९८३३४९८३३४/९८६७५९८६७५ किंवा एसएमएस – ९५०३२१११००/९५०३५१११००

Story img Loader