मुंबई : वाहतूक नियंत्रण शाखेने नुकत्याच राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २२१ ई-बाईक चालकांवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले, तर, २९० ई-बाईक्स जप्त करण्यात आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ई-बाईक्स चालक विशेषतः डिलेव्हरी बॉयकडून मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यांच्याविरोधात असंख्य तक्रारी वाहतूक नियंत्रण शाखेकडे केल्या जातात. हीच बाब लक्षात घेऊन ई-बाईक चालकांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून नुकतीच तीन दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत उपरोक्त कारवाई करण्यात आली.

हेही वाचा – बॉलीवूडची लोकप्रिय पटकथाकार जोडी सलीम – जावेद पुन्हा एकत्र येणार

हेही वाचा – म्हाडाच्या सोडतीसाठी बनावट संकेतस्थळ… इच्छुक अर्जदारांची अशी होते आर्थिक फसवणूक

या विशेष मोहिमेदरम्यान विरुद्ध दिशेने ई-बाईक चालविल्याप्रकरणी २७२, सिग्नल स्पीशप्रकरणी ४९१. निषिद्ध क्षेत्रात गाडी नेल्याप्रकरणी २५२ व स्थानिक गुन्हे १६१ अशा ११७६ ई-बाईक चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून एकूण १,६३,४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action taken against 221 e bike drivers under special campaign 290 e bikes seized mumbai print news ssb