मुंबई : इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्टेटस ठेवणाऱ्या दोघांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी ही कारवाई केली. कुलाबा मार्केट परिसरात काही व्यक्तींनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्टेटस ठेवल्याची माहिती सोमवारी मुंबई पोलिसांना दिली होती. त्यामुळे परिसरात जातीय तेढ निर्माण होईल, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कुलाबा पोलीस व दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यांनी तपासणी केली असता दोन १९ वर्षीय तरुणांचे मोबाइल स्टेटस पोलिसांनी तपासले. त्या वेळी त्यांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्टेटस ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्या स्टेटसची लिंक सेव्ह केली. तसेच त्याची छायाचित्रे काढून ठेवली आहेत. त्यांच्या या कृतीमुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना स्थानबद्ध केले आहे. सीआरपीसी १५१(३) अंतर्गत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.