अनिश पाटील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे आदेश शहरातील प्रत्येक वाहतूक चौकीला देण्यात आल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत त्यांच्यावरील कारवाईत दुपटीने वाढ झाली आहे. यावर्षी एकट्या ऑक्टोबर महिन्यात भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी व रिक्षा चालकांविरोधात २३ हजार ५४७ चालान जारी करण्यात आले.

हेही वाचा >>>मुंबई: ८५ लाखांचे १७ किलो अमली पदार्थ जप्त

रिक्षा व टॅक्सी चालक हे लांब पल्ल्याचे भाडे मिळविण्यासाठी अनेकदा नजिकचे भाडे नाकारत असल्याबाबत तक्रारी येतात. त्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकट्या ऑक्टोबर महिन्यात जवळचे भाडे नाकारणारे १५ हजार ३९५ रिक्षा चालक व आठ हजार १५२ टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे एकट्या ऑक्टोबर महिन्यात भाडे नाकारणाऱ्या २३ हजार ५४७ टॅक्सी व रिक्षा चालकांविरोधात वाहतुक पोलिसांनी कारवाई केली आहे. हा या वर्षांतील कारवाईचा उच्चांक आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात भाडे नाकारणाऱ्या १२ हजार ४३२ टॅक्सी व रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मुंबईत सुमारे ३४ हजार टॅक्सी व सव्वा लाख रिक्षा दररोज धावतात.

हेही वाचा >>>मुंबई: नाट्यगृहांमध्ये राजकीय कार्यक्रमांचा शिरकाव

वाहतुक शाखेचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा १७ ऑक्टोबरला याबाबतचे आदेश जारी करून जवळचे भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी व रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच भाडे नाकारणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याबाबतचे फलक रेल्वे व बस स्थानकाबाहेर दर्शनी भागावर लावण्यात यावे, असे सांगण्यात आले होते. भाडे नाकारण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर संबंधित रिक्षा, टॅक्सी चालकावर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे. तरी सर्व प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी आपल्या वाहतूक विभागातील रिक्षा व टॅक्सी चालक यांच्या संघटनांशी संपर्क साधून बैठकीचे आयोजन करावे. तसेच रिक्षा व टॅक्सी चालक यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागण्याबाबत व भाडे न नाकारण्याबाबत समज देवून त्यांचे प्रबोधन करण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे. भाडे नाकारण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित रिक्षा व टॅक्सी चालक यांच्यावर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी, असे आदेश वाहतुक पोलिसांना देण्यात आले होते.

हेही वाचा >>>कांदिवलीतील वास्तुविशारदच्या घरी ४१ लाखांची चोरी; चोरीनंतर पळून गेलेल्या कर्मचार्‍याला अटक

या वर्षातील कारवाई महिना-रिक्षा-टॅक्सी-एकूण चालान
जानेवारी-३१९-३८-३५७
फेब्रुवारी-५६५-५२-६१७
मार्च-८१५-६१-८७६
एप्रिल-१३३३-१०१५-२३४८
मेे-१३३१-२५२५-३८५६
जून-३२८४-२००२-५२८६
जुलै-९१४१-४९७१-१४११२
ऑगस्ट-११५२२-६८५७-१८३७९
सप्टेंबर-७४३५-४९९७-१२४३२
ऑक्टोबर-१५३९५-८१५२-२३५४७

हेही वाचा >>>SRA घोटाळ्यावरून संदीप देशपांडेंची किशोरी पेडणेकरांवर टीका; म्हणाले, “मग पैसे खाताना…”

बहुतांश तक्रारी दूरध्वनीद्वारे
भाडे नाकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांविरोधात तक्रारी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ८४५४९९९९९९ हा हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला आहे. तसेच या क्रमांकावर व्हॉट्सॲपवरून तक्रार करण्याचीही सुविधा आहे. आतापर्यंत भाडे नाकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सीबाबत सर्वाधिक तक्रारी उपनगरांतून आल्या असून त्याबाबत कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त(मुख्यालय) राजतिलक रौशन यांनी सांगितले. बहुतांश तक्रारी दूरध्वनीद्वारे करण्यात आल्या आहेत. त्यानंतर परिसरातील वाहतूक पोलिसांकडून संबंधित तक्रारची शाहनिशा केल्यानंतर संबंधित टॅक्सी चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. याशिवाय ट्वीटर व व्हॉट्सॲपद्वारेही तक्रारींची पडताळणी करून कारवाई करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action will be taken against rickshaw taxis who refuse fares within a month mumbai print news amy