बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात या पुढे झोपडय़ा दिसल्यास संबंधित वन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वन खात्याचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिला. या संदर्भात भाई जगताप व इतर सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. गोरेगाव येथील चित्रपट नगरीजवळ ४ मार्चला आग लागली व ती संजय गांधी उद्यानापर्यंत पसरली. या भागातील ५३ हजार  झोपडपट्टया तोडल्या तरी त्या जागेवर पुन्हा झोपडय़ा उभारल्या जात आहेत, याकडे जगताप यांनी लक्ष वेधले.

Story img Loader