मुंबई : मराठी चित्रपट व नाटय़सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने ‘अष्टविनायक’ नाटय़संस्था व ‘परिवारा’तर्फे अशोक सराफ यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सध्या ‘अष्टविनायक’ संस्थेच्या ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहेत. या नाटकाचा शनिवार, ४ जून रोजी दादरमधील शिवाजी मंदिर येथे सकाळी १०.३० वाजता प्रयोग होणार आहे. या प्रयोगाच्या मध्यांतरात अशोक सराफ यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

Amitabh Bachchan shouted at R Balki
दिग्दर्शकाच्या करिअरच्या पहिल्याच सिनेमाचा पहिलाच सीन; चिडलेले अमिताभ बच्चन त्याच्यावर सर्वांसमोर ओरडलेले अन्…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
raveena tandon 8 movies hit in a year
‘या’ अभिनेत्रीने एकेकाळी सेटवर साफ केला कचरा, पहिलाच सिनेमा झाला फ्लॉप; नंतर एकाच वर्षात दिले आठ सुपरहिट सिनेमे
Maharashtrachi Hasyajatra Fame Actress
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?
hrithik roshan share karan arjun movie memory
शाहरुख-सलमानची प्रमुख भूमिका, कौटुंबिक ड्रामा अन्…; ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ चित्रपट, हृतिक रोशनशी आहे खास कनेक्शन

अशोक सराफ यांच्यासोबत या नाटकात अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका आहे. चिन्मय मांडलेकर यांनी या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे हा सन्मान प्रयोग आणि सत्कार सोहळय़ासाठी नाटय़रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. करोनाचा काळ वगळता गेली चार वर्षे ‘व्हॅक्यूम क्लीनर’ हे नाटक अशोक सराफ यांच्या सहकार्याने रंगभूमीवर जोरात सुरू आहे. महाराष्ट्र, गोवा, इंदूर इत्यादी ठिकाणी या नाटकाचे आतापर्यंत ३०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. सामाजिक बांधिलकीचे भान राखून कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘अष्टविनायक’ परिवाराने या नाटकाचे दोन प्रयोग सादर केले आहेत. त्यातून मिळालेला तीन लाख रुपये निधी संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला आहे.

अशोक सराफ यांच्यासारख्या सहृदयी व गुणी कलाकाराचा त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त सन्मान करण्याचा योग ‘अष्टविनायक’ संस्थेच्या परिवाराला मिळत आहे. हे आमचे भाग्यच आहे, असे मत या नाटय़संस्थेचे ज्येष्ठ निर्माते दिलीप जाधव यांनी व्यक्त केले.