बाजीगर चित्रपटात निगेटिव्ह भूमिका निभावल्यानंतर प्रसिद्धीस आलेले अभिनेता दलीप ताहिल यांना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दलीप ताहिल दारु पिऊन गाडी चालवत होते. दारुच्या नशेत त्यांनी एक रिक्षाला धडक दिली. सोमवारी रात्री ९ वाजता ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खारमध्ये राहणारे जेनिता गांधी (२१) आणि गौरव चुघ (२२) रिक्षातून जात असताना दलीप यांच्या कारने त्यांना धडक दिली. अपघातात जेनिताच्या पाठीला आणि मानेला गंभीर दुखापत झाली आहे. गौरव याने रिक्षातून बाहेर येऊन पाहिलं असता कार सांताक्रूझच्या दिशेने जात असल्याचं त्याने पाहिलं.

दलीप ताहिल यांनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण रस्त्यावर गर्दी असल्याने ते जास्त दूर जाऊ शकले नाहीत. जेनिताने प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली की, ‘आम्ही कारचा नंबर नोंद केला होता. दलीप आमच्याशी वाद घालू लागल्यानंतर आम्ही पोलिसांना बोलावलं. खार पोलीस घटनास्थळी आले आणि आम्हा सर्वांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले’.

खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय यांनी सांगितलं आहे की, ‘दलीप यांना अटक करण्यात आली होती, नंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आलं. दलीप यांनी रक्ताची चाचणी करण्यास नकार दिला. मात्र त्यांच्याकडून पाहून मद्यपान केलं असल्याचं लक्षात येत होतं’. दलीप ताहिल यांनी ‘राजा’, ‘इश्क’ आणि ‘सोल्जर’ यासारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.