मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याच्या २०२० सालच्या प्रकरणात केआरके नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता कमाल आर. खान याला बुधवारी कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला. खान याला मंगळवारीही २०२१ सालच्या विनयभंगाच्या प्रकरणात जामीन मिळाला होता. त्यामुळे खान हा गुरूवारी कारागृहातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आजही निर्णय नाहीच; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

हेही वाचा : चेंबूरमध्ये अवजड वाहनांमुळे विद्यार्थ्यांची कोंडी

ट्विटप्रकरणी खान याला पोलिसांनी गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावरून अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांच्या आरोपांनुसार, खान याने केलेले ट्विट जातीयवादी होते आणि त्याने बॉलिवूडमधील व्यक्तींना लक्ष्य केले होते. तर आपले ट्विट् फक्त “लक्ष्मी बॉम्ब” (नंतर केवळ “लक्ष्मी” या नावाने प्रसिद्ध झालेल्या) नावाच्या चित्रपटावरील टिप्पण्या होत्या आणि पोलिसांनी आरोप केल्याप्रमाणे त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. शिवाय आपण चित्रपट क्षेत्रात समीक्षक किंवा पत्रकार म्हणून कार्यरत असल्याचा दावा खान याने जामिनाची मागणी करताना केला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor krk bail offensive tweet case clear way out prison mumbai print news ysh