मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये मोठमोठ्या चित्रपटांच्या निर्मिती खर्चावरून वादविवाद रंगले आहेत. मोठ्या कलाकारांच्या मानधनापासून त्यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांवर केला जाणारा खर्च खूप मोठा आहे. प्रत्यक्षात चांगल्या चित्रपटाच्या निर्मितीवर होणारा खर्च हा त्या तुलनेत अगदीच कमी आहे. त्यामुळे एखादा मोठा चित्रपट आपटला की त्याचा थेट फटका निर्मात्यांना बसतो. अभिनेता म्हणून सुरूवातीपासूनच याविरोधात भूमिका घेणाऱ्या अभिनेता नवाझुद्दीनने यासंदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना हिंदी चित्रपटसृष्टीतील तथाकथित तारांकित कलाकारांची चित्रपटामागची आर्थिक समीकरणे लक्षात येण्यापलिकडची आहेत, असे सांगितले.

हेही वाचा >>> शबाना आझमी यांचं जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबाबत वक्तव्य, “तिने मुलांच्या मनात विष…”

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Anand Mahindra reacts to parent hack video
Anand Mahindra: अहो, थांबा! परदेशी नागरिकाचा ‘जुगाड’ पाहून आनंद महिंद्रा झाले थक्क; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाले, ‘आमचा मुकुट…’

बॉलीवूडमध्ये खूप अवाढव्य खर्च करून चित्रपट बनवले जातात, मात्र त्यातला प्रत्यक्षात किती पैसा चित्रपटाच्या निर्मितीवर केला जातो? याबद्दल दबक्या आवाजात का होईना सध्या चर्चा सुरू आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सारखा अफाट निर्मितीखर्च असलेला चित्रपट आपटल्यानंतर या चर्चेने आणखी जोर धरला आहे. व्यावसायिक चित्रपटांवर इतका खर्च का केला जातो? हिंदी चित्रपटातील मोठमोठ्या कलाकारांची यामागची आर्थिक समीकरणेच आपल्याला समजत नाहीत, असे नवाझुद्दीनने सांगितले. सध्या झी ५ वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘रौतु का राज’ या चित्रपटाच्या निमित्ताने नवाझुद्दीन सिद्दीकीने माध्यमांशी संवाद साधला आहे.

हेही वाचा >>> विकी कौशलचे ‘तौबा तौबा’ गाणे पाहून नेटकऱ्यांना आली कतरिना कैफच्या ‘कमली’ डान्सची आठवण; म्हणाले, “तुला तर चांगली शिक्षिका…”

चित्रपटगृहात प्रदर्शित केल्या जाणाऱ्या व्यावसायिक चित्रपटांसाठी वापरली जाणारी ही समीकरणे, प्रसिध्द कलाकारच हवेत अशापध्दतीचे ठोकताळे हे वारे आता ओटीटी माध्यमांवरही शिरले असल्याची खंत त्याने व्यक्त केली. करोनाकाळापूर्वी आणि त्यानंतरही नेटफ्लिक्सवर ‘सेक्रेड गेम्स’, ‘सीरियस मेन’ सारख्या वेबमालिका आणि चित्रपटातील भूमिकांमुळे नवाझुद्दीन नावारुपाला आला होता. ‘सेक्रेड गेम्स’ सारखी वेबमालिका जगभरात पाहिली गेली, लोकप्रिय ठरली, त्याला पुरस्कारही मिळाले. या वेबमालिकांचा, चित्रपटांचा आशय वेगळा होता, त्यामुळे ओटीटीसारख्या नव्या माध्यमांवर प्रदर्शित होऊनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता ओटीटीसाठीही मोठे कलाकार, मोठा खर्च करून आशयनिर्मिती केली जाते, असे त्याने सांगितले. तरीही ओटीटी माध्यम हे त्याच्यासारख्या कलाकाराला वैविध्यपूर्ण भूमिका करण्याची संधी देणारे माध्यम ठरले आहे, असे त्याने सांगितले. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात नवाझुद्दीनची मुख्य भूमिका असलेला ‘हड्डी’ हा चित्रपट झी ५ वर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याचे कौतुक झाले होते. आताही त्याचा ‘रौतु का राज’ हा आनंद सुरापूर दिग्दर्शित चित्रपट झी ५ या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे.

Story img Loader