मुंबई : ‘पडद्यावर आज मी जो काही अभिनय करतो, त्याचे मूळ रंगभूमीवर घेतलेल्या शिक्षणातच दडलेले आहे. माझ्यातील अभिनय कौशल्याचा पाया हा नाटकातून पक्का झाला. चित्रपट, वेबमालिका अशा विविध माध्यमांतून नवे काही साध्य करत असलो तरी रंगभूमी ही माझी गुरू आहे. अभिनयाचे जन्मजात गुण असले तरी त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षणही आवश्यकच आहे,’असे ठाम प्रतिपादन ख्यातनाम अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी शनिवारी केले. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या नवव्या पर्वाचा दिमाखदार महाअंतिम सोहळा शनिवारी, २१ डिसेंबरला माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात मोठ्या उत्साहात रंगला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे स्वागतच जोरदार टाळ्या आणि ‘कालिन भैयां’च्या जयजयकाराने झाले. व्यक्तिमत्त्वातला साधेपणा, बोलण्यातले मार्दव आणि सहज बोलतानाही डोकावणारी विनोदबुद्धी हे एरवी पडद्यावर दिसणारे पंकज त्रिपाठी यांचे रूप प्रत्यक्षात अनुभवताना युवा रंगकर्मी हरखून गेले. मी स्वत: अजून शिकतो आहे, मी कोणाला काय मार्गदर्शन करणार? अशी मिश्कील टिप्पणी करत गप्पांमधून उपस्थितांशी संवाद साधण्याला त्यांनी पसंती दिली. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी त्रिपाठी यांना बोलते केले. आपल्यातील अभिनेता हा रंगभूमीवरच घडलेला असल्याने कुठेही युवा रंगकर्मींचा कार्यक्रम असेल तर तेथे उपस्थित राहून त्यांचे सादरीकरण अनुभवणे ही आपल्याला नैतिक जबाबदारी वाटते. याच भूमिकेतून ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर मी उपस्थित झालो, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>घाटकोपरमधील मुलाच्या मृत्यू प्रकरणात सोसायटीवर गुन्हा
‘मी सुरुवातीला उत्स्फूर्त अभिनय करत होतो, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मध्ये प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली तेव्हा गोंधळलेल्या मनोवस्थेत अभिनय करत होतो. तेथे गेल्यानंतर पहिल्या वर्षी सुतारकाम करावे लागले. अभिनेता होण्यासाठी आलो आहे आणि हे काय सुतारकाम करायला लावत आहेत, पुस्तके अभ्यासायला देत आहेत, असा विचार मनात यायचा. पण ते नुसते सुतारकाम नव्हते तर त्यातून वेगवेगळे आयाम कसे असतात, आकार-रचना, सौंदर्याचे पैलू काय आहेत या सगळ्याचे आपसूक आकलन होत जायचे. आज इतक्या वर्षांनंतर चित्रपटात काम करताना त्या शिक्षणाचे महत्त्व लक्षात येत आहे’ असा एनएसडीतला स्वानुभव सांगतानाच तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शिक्षण मिळत असेल तर कंटाळा न करता ते घ्या. पुढे दहा-पंधरा वर्षांनी त्याचा तुम्हाला निश्चितच प्रत्यक्ष काम करताना फायदा होईल, असा सल्ला त्यांनी युवा रंगकर्मींना दिला.
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे गिरीश थॉमस यांनी अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे स्वागत केले, तर ‘सॉफ्ट कॉर्नर’चे दिलीप कुलकर्णी यांनी त्रिपाठी यांना भेटवस्तू दिली.
हेही वाचा >>>मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आठपदरीकरण: आठपदरीकरणाच्या प्रस्तावास राज्य सरकारच्या मान्यतेची प्रतीक्षा
‘उम्मीद पे दुनिया कायम है… ’
रंगभूमीवरचे अनुभव, अभिनयाचे शिक्षण आणि प्रत्यक्ष काम करताना येणारी आव्हाने अशा नानाविध मुद्द्यांवर रंगलेल्या या गप्पांचा समारोप करताना त्रिपाठी यांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या अंतिम फेरीत सहभाग झालेल्या युवा रंगकर्मींशी खास संवाद साधला. आजच्या स्पर्धेत जे जिंकले आहेत त्यांनी हरण्याची आशा गमावली आहे, तर आज हरलेल्यांना अजूनही जिंकण्याची आशा कायम आहे. अखेर उम्मीद पे दुनिया कायम है… हे त्रिपाठी यांचे शब्द विजेत्यांचे भान जागवणारे आणि स्पर्धकांना दिलासा देणारे ठरले.
‘अभिनय तंत्रही तितकेच महत्त्वाचे’
जन्मजात अभिनय गुण किंवा उत्स्फूर्तता असला तर अभिनयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्याने सादरीकरणात फरक पडतो. नैसर्गिक अभिनय दीर्घकाळ उपयुक्त ठरत नाही. कॅमेऱ्यासमोर काम करत असताना तुमचा अभिनय शैलीदार होण्यासाठीचे तंत्र तुम्हाला माहिती असले तर तुमचा अभिनय टोकदार होतो, असे सांगून शास्त्रशुद्ध अभिनय प्रशिक्षण घेतलेच पाहिजे, असे आग्रही मत त्यांनी व्यक्त केले.