मुंबई : ओमकार रिॲल्टर्स आणि डेव्हलपर्सशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यातून अभिनेता-व्यावसायिक सचिन जोशी याला विशेष न्यायालयाने मंगळवारी दोषमुक्त केले. जोशी याला फेब्रुवारी २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जोशी याला अंतरिम जामीन मंजूर केला होता. मार्च २०२२ मध्ये विशेष न्यायालयानेही जोशी याला नियमित जामीन मंजूर केला. त्याने आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत नसल्याचे विशेष न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताना नमूद केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ‘लम्पी’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली करणार का?; उच्च न्यायालयाची राज्य सरकारकडे विचारणा

हेही वाचा >>> कर्जदारांच्या विधवा पत्नीला सौजन्याची वागणूक द्या; डॉ. नीलम गोऱ्हे यांची सूचना

ओमकार रिॲल्टर्स आणि डेव्हलपर्सचे प्रवर्तक बाबूलाल वर्मा आणि अध्यक्ष कमल किशोर गुप्ता यांना विशेष न्यायालयाने आर्थिक गैव्यवहाराच्या आरोपांतून दोषमुक्त केले होते. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याबाबत (पीएमएलए) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारे विशेष न्यायालयाने या दोघांना दोषमुक्त केले होते. मूळ गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने या दोघांविरोधात तक्रार नोंदवली होती. परंतु मूळ गुन्ह्यांत दोघांची निर्दोष सुटका झाली. त्यामुळेच विशेष न्यायालयाने त्यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातून दोषमुक्त केले होते. जोशी यानेही याच पार्श्वभूमीवर या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी केली होती. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी त्याची मागणी मान्य करून जोशी याला प्रकरणातून दोषमुक्त केले.