G20 Summit: भारताची राजधानी दिल्लीत जी२० परिषद पार पडली. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत अमेरिकेसह दिग्गज देशांचे प्रमुख सहभागी झाले. तसेच अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर अभिनेता शाहरुख खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत एक ट्वीट केलं. तसेच जी २० वर त्याची भूमिका मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुख खानने त्याच्या ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. तो म्हणाला, “भारताच्या अध्यक्षतेखालील जी२० परिषदेचं यश आणि जगभरातील लोकांच्या चांगल्या भविष्यासाठी देशांमधील एकतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन. यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात सन्मान आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.”

मोदींच्या नेतृत्वात आम्ही एकतेत पुढे जाऊ – शाहरुख खान

“सर, तुमच्या नेतृत्वात आम्ही विभाजनात नाही, तर एकतेत समृद्ध होऊ. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक वर्तमान,” असंही शाहरुख खानने या ट्वीटमध्ये नमूद केलं.

हेही वाचा : जी२० परिषदेतील सोन्या-चांदीच्या ताटांवरून शरद पवारांनी मोदींना फटकारलं, म्हणाले, “आधी…”

बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानने मानले अकोलेकरांचे आभार

दरम्यान, सध्या शाहरुख खान त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरला असून बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत आहे. अकोल्यातील ‘एसआरके वॉरियर्स’ या समूहाने चित्रपटगृहावर शाहरुख खानचा मोठा फलक लावला. समाजमाध्यमांवर याची चित्रफीत पाहून बॉलीवूड किंग शाहरुख खान त्या फलकावर चांगलाच भावला आहे. त्याने आपल्या अकोलेकर चाहत्यांचे आभार मानत, ‘असेच प्रेम करा, आनंदी रहा’, असे ट्वीट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor shahrukh khan comment on g20 summit pm narendra modi pbs