मुंबईः अभिनेता विवेक ओबेरॉयची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांनी संजय साहा या व्यावसायिकाला अटक केली. आरोपी विवेक ओबेरॉयचा व्यावसायिक भागिदार आहे.

याप्रकरणी निर्माता संजय साहा यांच्यासह नंदिता साहा, राधिका नंदा व इतर आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता. ओबेरॉय मेगा एन्टरटेनमेंट सनदी लेखापाल देवेन जवाहरलाल बाफना (५७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जुलै महिन्यात हा गुन्हा नोंदवला होता. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ फेब्रुवारी २०१७ रोजी ओबेरॉय आणि त्याची पत्नी प्रियांका यांनी ऑरगॅनिक एलएलपीची स्थापना केली होती. ऑरगॅनिक क्षेत्रात जास्त मागणी न मिळाल्याने त्यांनी सिने क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. त्याचदरम्यान विवेक यांची संजय साहा यांच्याशी ओळख झाली. साहा यांना चित्रपट निर्मितीचा अनुभव असल्याने एकत्रित काम करण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे संजय साहा यांच्यासह नंदिता साहा, राधिका नंदा यांनाही त्यांच्या कंपनीत भागिदार केले.

mpsc group b exam paper and answer sheet leak offered for 40 lakh rupees
‘एलआयसी’ पॉलिसीच्या नावाखाली फसवणूक करणारे गजाआड, मुंबई-पुणे रस्त्यावरील काॅलसेंटरवर छापा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Sangli Crime News
Sangli Crime : सांगलीत १०० रुपयांचं स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघांना अटक
shoes of accused in Saif attack case seized Mumbai crime news
पोलिसांच्या हाती आणखी पुरावे; सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचे बूट जप्त
Anjali Damania on Vishnu Chate
Anjali Damania: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला विशेष वागणूक? बीडऐवजी लातूर कारागृहात ठेवल्याचा अंजली दमानियांचा आरोप
Saif ali khan case, Investigation , Saif ali khan house ,
आरोपीला सैफच्या घरी नेऊन तपास
person who came to Thane for selling whale fish vomit ambergris arrested by thane Polices Crime Investigation Branch
वारजे भागात सराईताकडून तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत अटकेत

हेही वाचा – हँगिंग गार्डनमध्ये आरेची पुनरावृत्ती नको, मलबार हिलच्या नागरिकांनी व्यक्त केली भीती

पुढे त्यांनी आनंदिता एन्टरटेनमेंट एलएलपी या कंपनीची स्थापना केली. या कंपनीत विवेक ओबेरॉय यांनी वैयक्तिक खात्यातून, तसेच ओबेराय मेगा एन्टरटेनमेंट एलएलपीमधून एकूण ९५ लाख ७२ हजार ८१४ रुपयांची गुंतवणूक केली. आरोपींनी आनंदिता कंपनीच्या व्यवहारांची कुठलीही माहिती विवेकला न देता वैयक्तिक वापरासाठी रक्कम खर्च केली. त्यामुळे विवेकची एक कोटी ५५ लाख ७२ हजार ८१४ रुपयांची फसवणूक झाली, असा आरोप आहे.

हेही वाचा – ‘इंडिया’च्या ‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट, मुंबईत कार्यकर्ते-पोलिसांत धुमश्चक्री, अनेक नेते-पदाधिकारी ताब्यात

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याबाबत एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. ४ फेब्रुवारी २०२० ते ३० एप्रिल २०२२ दरम्यान ही फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader