अभिनेत्री युक्ता मुखीच्या मोलकरणीला कांदिवली पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. सुनिता वालिक (३०) असे तिचे नाव असून कांदिवली येथील एका घरातून सहा लाखांची चोरी करून ती फरार झाली होती.
कांदिवली रेल्वे वसाहती राहणाऱ्या नग्मा यमन यांच्या घरी २१ एप्रिलपासून सुनिता कामाला होती. ४ मे रोजी घरात कुणी नसताना सुनिताने प्रियकर विनोदच्या मदतीने घरातील रक्कम व दागिने असा सहा लाखांचा ऐवज लुटून पळ काढला होता.
युक्ता हिच्या अंधेरी येथील घरी अवघ्या आठच दिवसांपूर्वी सुनिताने काम मिळवले होते. तेथेही ती हात साफ करण्याच्या प्रयत्नात होती.  पण कांदिवली पोलिसांनी तिला प्रियकरासह शनिवारी अटक केली.

Story img Loader