ज्येष्ठ नाटय़ व चित्रपट अभिनेत्री नयनतारा (६४) यांचे रविवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मधुमेहाने त्रस्त होत्या. रविवारी ठाण्यातील निवासस्थानी अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकासह ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘अशी ही बनवा बनवी’, ‘धांगडधिंगा’ आदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या होत्या.
आणखी वाचा