मुंबई : बलात्काराच्या कथित आरोपप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेता आदित्य पांचोली याने उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने पोलिसांना नोटीस बजावून याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पांचोली याच्यावर वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी २०१९ मध्ये हा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी पांचोली याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर पांचोली याची याचिका मंगळवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना नोटीस बजावून याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच प्रकरणाची सुनावणी सप्टेंबर महिन्यात ठेवली.