लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबईः सक्तवसुली संलनालयाने(ईडी) उद्योगपती राज कुंद्रा यांना दुसरे समन्स पाठवले असून बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी हा समन्स पाठवण्यात आला आहे. कुंद्रा हे अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आहे. याप्रकरणी मॉडेल व अभिनेत्री गहना वशिष्ठलाही समन्स पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
tejashri pradhan shares post about her hashtag tadev lagnam marathi movie not enough screens
सिनेमा हाऊसफुल, तरीही थिएटर नाहीत…; तेजश्री प्रधानची खंत! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटासाठी पोस्ट करत म्हणाली…

ईडीने राज कुंद्रा यांना समन्स पाठवून सोमवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. पण ते सोमवारी चौकशीला उपस्थित राहिले नाही. यावेळी त्यांनी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी वेळेची मागणी केली. ती मागणी ईडीने फेटाळली असून त्यांना दुसरा समन्स पाठवण्यात आला आहे. त्यांना बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. अभिनेत्री गहना वशिष्ठलाही याप्रकरणी समन्स बजावण्यात आला असून तिला ९ डिसेंबरला चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

आणखी वाचा-घाटकोपर फलक दुर्घटनाप्रकरणी माजी संचालिकेला जामीन

याप्रकरणी ईडी आठवड्याभरापूर्वी १५ ठिकाणी छापे टाकले होते. त्यात राज कुंद्रा यांच्या ठिकाणांचाही समावेश होता. त्यात वशिष्ठच्या ठिकाणांचाही समावेश आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांन मे २०२२ मध्ये अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर ईडी तपास करत आहे.

अश्लील चित्रफीत निर्माण करून त्याच्या प्रसारणासाठी आरोपींंनी २०१९ मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून अश्लील चित्रफीती प्रसारणासाठी तयार करण्यात आलेले हॉटशॉट्स नावाचे अॅप्लिकेशन लंडनस्थीत केनरीन कंपनीला विकले. पण या अॅप्लिकेशनबाबतची बरीच कामे कुंद्रामार्फतच चालू होती, असा आरोप आहे. या अॅप्लिकेशन निर्मितीसाठी राज कुंद्राने पैशांची गुंतवणूक केली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले होते. अभिनेत्री गहना वशिष्ठला मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने अटक केली होती.

Story img Loader