‘हरे राम हरे कृष्ण’, ‘यादों की बारात’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘ग्रेट गॅम्बलर’, ‘डॉन’ यांसारखे चित्रपटांतील अभिनय आणि ‘सेक्स सिम्बॉल’ म्हणून गाजलेली अभिनेत्री झीनत अमान पुन्हा विवाह करणार आहे. आता वयाची साठी ओलांडल्यानंतर ती कुणाशी विवाहबद्ध होणार आहे त्याचे नाव मात्र तिने गुलदस्त्यात ठेवले आहे.
अभिनेता मझहर खान याच्याशी झीनत अमानने लग्न केले. अजान (२६) आणि झहान (२३) अशी दोन मुले त्यांना आहेत. मझहर खानचे १९९८ साली निधन झाल्यानंतर आपण पुन्हा विवाह करण्याचा विचार सोडून दिला होता. परंतु, आता आपल्या आयुष्यात एक भारतीय व्यक्ती आली असून आम्ही विवाहाचा विचार करीत आहोत, असे झीनत अमानने म्हटले आहे. विवाह करण्याचा विचार दोन्ही मुलांना सांगितला असून त्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे, असेही झीनत अमानने म्हटले आहे. भावी वराचे नाव मात्र झीनत अमानने जाहीर केलेले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा