मुंबईत अनधिकृतपणे मोबाइल टॉवर उभारणाऱ्यांविरूध्द एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सोमवारी स्पष्ट केले. मुंबईत सुमारे ३६०० मोबाइल टॉवर असून त्यापैकी १८०० अधिकृत आहेत, अशी माहिती देऊन सीताराम कुंटे म्हणाले की, केंद्र सरकारने मोबाइल टॉवर संदर्भात १ सप्टेंबर रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. मोबाइल टॉवरच्या उभारणीबाबत त्यात काही नियमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हे नियम विचारात घेऊन स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरातील सर्व मोबाइल टॉवरची तपासणी करण्यात येणार असून त्यास इमारत आणि कारखाने विभागाची अनुमती आहे की नाही, हेही पाहण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा