मुंबई : अदानी वीज कंपनीची वीज महागली असून त्याचा फटका सुमारे ३० लाख वीज ग्राहकांना बसणार आहे. मे महिन्याच्या बिलापासून निवासी ग्राहकांच्या इंधन अधिभारात प्रति युनिट ७० पैसे ते १.७० रुपये इतकी मोठी वाढ होणार आहे.
हेही वाचा >>> मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
मुंबईकरांना उन्हाचा तडाखा बसत असतानाच आता मे महिन्यापासून, वीज दरवाढीच्या झळाही सहन कराव्या लागणार आहेत. गेल्यावर्षी इंधन खर्चात झालेल्या वाढीपोटी ३१८ कोटी ३८ लाख रुपये वसूल करण्यासाठी अदानी कंपनीने राज्य वीज नियामक आयोगापुढे प्रस्ताव सादर केला होता. त्याला आयोगाने सोमवारी मंजुरी दिली. ही रक्कम इंधन अधिभारातून मे ते ऑगस्ट २४ या काळात ग्राहकांकडून वसूल केली जाईल. वाणिज्य, औद्योगिकसह अन्य ग्राहकांसाठीही वीज वापरानुसार इंधन अधिभार आकारला जाणार आहे.
कुणाला किती भुर्दंड?
मे महिन्यापासून दरमहा ०-१००युनिट वीज वापर असणाऱ्या निवासी ग्राहकांकडून प्रति युनिट ७० पैसे, १०१-३०० युनिटसाठी १.१० रुपये, ३०१-५०० युनिटसाठी १.५ रुपये आणि ५०० हून अधिक वीजवापरासाठी १.७० रुपये इंधन अधिभार आकारण्यात येणार आहे.