मुंबई : गौतम अदानींवर झालेल्या लाचखोरीच्या आरोपामुळे आणि अमेरिकेत गुन्हे दाखल झाल्यामुळे अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांना गुरुवारच्या सकाळच्या व्यवहारात २३ टक्क्यांपर्यंतच्या घसरणीचा दणका बसला. समूहाच्या बाजार भांडवलाचा एका दिवसात तब्बल २.४५ लाख कोटी रुपयांनी ऱ्हास झाला.

ऊर्जा क्षेत्रातील कंत्राटे मिळवण्यासाठी भारतात सरकारी अधिकाऱ्यांना लाच आणि त्यात सहयोगी अमेरिकी कंपनीच्याही भूमिकेचा गौतम अदानी यांच्यासह अदानी समूहातील कंपन्यांतील सात अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा नकारात्मक परिणाम म्हणून अदानी समूहातील मोठी कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसचा समभाग एका सत्रात २३ टक्क्यांपर्यंत कोसळला. त्यापाठोपाठ अदानी समूहातील इतर कंपन्यांच्या समभागांमध्ये देखील १० टक्के ते २० टक्क्यांपर्यंत मोठी घसरण झाली. त्यातील काही कंपन्यांच्या समभागांनी दिवसांतील नीचांकी (लोअर सर्किट) पातळी गाठली. परिणामी सकाळच्या सत्रात समूहातील सर्व अकरा सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल २,४५,०१६ कोटींनी घटले होते. मात्र बाजार बंद होते वेळी काही कंपन्यांचे समभाग सावरल्याने नुकसान काहीअंशी कमी झाले.

Arunkumar Singh employee, Ashish Mittal,
अरुणकुमार सिंगच्या कर्मचाऱ्याकडून आशिष मित्तलला पैसे, कल्याणीनगर अपघात प्रकरण
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
case registered against who sold clay pots by blocking road in kalyan
कल्याणमध्ये रस्ता अडवून मातीच्या कुंडी विकणाऱ्यावर गुन्हा दाखल
drug cartel kingpin lalit patil
चाकणमधील मेफेड्रोन प्रकरण;  खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ; अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी
police inspector corruption
प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक

हेही वाचा…Gautam Adani Fraud: अदाणी समूहानं जारी केलं अमेरिकेतील आरोपांवर निवेदन; भ्रष्टाचार प्रकरणाबाबत मांडली भूमिका!

गेल्या वर्षी अमेरिकेतील गुंतवणूक संस्था हिंडेनबर्ग रिसर्चच्या अदानी समूहावरील अहवालातील, लबाडी आणि अनियमिततांचा उलगड्यानंतर झालेल्या समभागांच्या पडझडीत समूहाचे बाजार भांडवल सुमारे १० लाख कोटींहून अधिक रोडावले होते.

‘जीक्यूजी पार्टनर्स’लाही झळ !

अदानी समूहातील कंपन्यातील मोठा गुंतवणूकदार असलेल्या ‘जीक्यूजी पार्टनर्स’लाही गौतम अदानी यांच्यावर नव्याने झालेल्या आरोपांची गुरुवारी झळ बसली. ऑस्ट्रेलियाच्या ‘एएसएक्स’ या शेअर बाजारावर सूचिबद्ध ‘जीक्यूजी’चे समभाग २६ टक्क्यांनी गडगडले. ‘जीक्यूजी पार्टनर्स’ची अदानी समूहातील चार कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक आहे. विशेषतः हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांनंतर ही गुंतवणूक करून तिने अदानी समूहातील समभागांना सावरण्यात मोलाचे योगदान दिले होते.

हेही वाचा…Gold Silver Price Today : ऐन निवडणुकीत सोन्याच्या दरात पुन्हा तेजी! नेमकं किती रुपयांनी महागलं; वाचा तुमच्या शहरातील दर

समभागांतील घसरण-कळा

अदानी टोटल गॅस ६०१.९० -६९.८५ (-१०.४० टक्के)

अदानी ग्रीन एनर्जी १,१४५.७० – २६७ (-१८.९० टक्के)
अदानी इंटरप्रायझेस २,१८३.६५ -६३७.८५ (-२२.६१ टक्के)

अदानी पोर्ट्स १,११४.६५ -१७५ (-१३.५७ टक्के)
अदानी विल्मर २९४.९० -३२.७५ (-१०.०० टक्के)

अदानी पॉवर ४७६.१५ -४७.९५ (-९.१५ टक्के)
अंबुजा सिमेंट ४८४.१५ -६५.४० (-११.९० टक्के)

एसीसी २,०२७.२० -१५८.५० (-७.२५ टक्के)
एनडीटीव्ही १६७.६७ -१.१२ (-०.६६ टक्के)

अदानी एनर्जी सोल्युशन ६९७.२५ -१७४.३० (-२० टक्के)
सांघी इंडस्ट्रीज ७६.३१ -५.०५ (-६.२१ टक्के)

(मुंबई शेअर बाजारातील शुक्रवारचा बंद भाव)