कारगिल हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना घरे देण्याचे कारण पुढे करून बांधलेल्या वादग्रस्त आदर्श सोसायटी घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात असून येत्या आठवडय़ात चौकशी अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा आठवडा गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.
आदर्श घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जे. ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील द्विसदस्य समितीची स्थापना राज्य सरकारने केली होती. आदर्श सोसायटीची जमीन संरक्षण खात्याची नसून राज्य सरकारचीच आहे, असा निर्वाळा या समितीने गेल्या वर्षी सरकारला सादर केलेल्या अंतरिम अहवालात दिला होता. आता समितीचा अंतिम अहवाल अखेरच्या टप्प्यात असून आठवडाभरात तो सरकारला सादर करण्यात येईल ,असे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा