विनायक डिगे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यातील गैरकारभारामुळे गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयांमध्ये सातत्याने औषधे व वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, आता हा तुटवडा दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी सुट्टीच्या दिवशीही त्यांनी महापालिकेला औषध पुरवठा करणाऱ्या वितरकांसोबत जवळपास तीन ते चार तास चर्चा केली.

मुंबई महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षम व्हावी आणि रुग्णांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे हे काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. त्यानुसार त्यांनी रुग्णालयामध्ये अचानक भेटी देऊन रुग्णांना आवश्यक सुविधा पुरवण्याकडे तसेच रुग्णालयाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले आहे. याचे परिणाम महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये दिसून येत आहेत. यापुढे आता डॉ. शिंदे यांनी रुग्णालयातील औषधांच्या तुटवडय़ाकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार डॉ. शिंदे यांनी शनिवारी सुट्टीच्या दिवशी महानगरपालिकेला औषधपुरवठा करणाऱ्या सर्व वितरकांची तातडीची बैठक घेतली.

रुग्णांना औषधे मिळावीत यासाठी दर कराराची प्रक्रिया तातडीने राबविण्याचा अतिरिक्त आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पण मध्यवर्ती खरेदी खात्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्थानिक खरेदीमधील दर करार अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे संपुष्टात आणणार का? असा प्रश्न ऑल फूड अॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांड यांनी उपस्थित केला आहे.