मुंबई: अपघातानंतर कायमचे अपंगत्व आलेल्या २६ वर्षांच्या तरूणाला केवळ शारीरिक आणि मानसिक त्रासच सहन करावा लागत नाही तर त्याच्या वैवाहिक नातेसंबंधावरही त्याचा परिणाम होतो. मुलांचे पालनपोषण करण्याची त्याची स्वप्ने भंग पावतात, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच याचिकाकर्त्याच्या नुकसानभरपाईत एक कोटी रुपयांपर्यंत वाढ केली.योगेश पांचाळ हे २००४ मध्ये रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांना कायमचे अपंगत्त्व आले. नुकसानभरपाईसाठी पांचाळ यांनी मोटार वाहन अपघात दावा लवादाकडे अर्ज केला होता. लवादाने त्यांना ४८ लाख रुपयांची नुकसान भरपाई ७.५ टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिले होते. मात्र या निर्णयाबाबत असमाधानी असलेल्या पांचाळ यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली व भरपाईची रक्कम वाढवून देण्याची मागणी केली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in