मुंबई : मुंबईतील राजकीय फलकबाजीला आळा घालण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे यांनी आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आवाहन केले आहे. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी बेकायदेशीर पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग्ज न लावण्याचा निर्णय घेतला, तर नागरिकांना आपण मोठा दिलासा देऊ शकतो, असे आवाहन ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> राज्याच्या उद्योग सचिवपदी डॉ. पी. अनबलगन, १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईत जागोजागी राजकीय फलकांचे अक्षरशः पेव फुटले आहे. या फलकबाजीबद्दल नागरिकांनी समाजमाध्यमांवरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच न्यायालयानेही या प्रकरणी मुंबई महापालिकेला फटकारले होते. मुंबई महापालिकेच्या यंत्रणेने जाहिरात फलक हटवले तरी काही विभागात काही ठराविक पक्षांचे फलक दिसत असल्याबाबतही समाजमाध्यमांवर टीका होत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापना व शपथविधीनंतर आमदारांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर फलकबाजी केली. राजकीय पक्षांच्या बरोबरीने नेत्यांचेही फलक मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांनीच या फलकबाजीला आळा घालावा, अशी भूमिका शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. त्यांनी त्याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.

हेही वाचा >>> सलग दुसऱ्या दिवशी हवेची स्थिती खालावलेली; माझगाव, नेव्ही नगर कुलाबा, मालाड येथील हवा ‘वाईट’

२०२५ मध्ये पदार्पण करताना, तसेच लोकसेवेचा संकल्प सोडताना पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ शकता. गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या राजकीय गोंधळामुळे, प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात हजारो राजकीय पोस्टर (कायदेशीर आणि बेकायदेशीर) पाहायला मिळत आहेत. एक नागरिक म्हणून हे पाहून खेद वाटतो आणि एक व्यक्ती म्हणून शहर विद्रुप करणाऱ्या अशा पोस्टर्सचा त्रास होतो. त्यामुळे राजकीय फलक न लावण्याचे आवाहन करण्याकरीता आपण पहिले पाऊल टाका, आम्हीही तुमच्या पाठीशी आहोत, असेही आश्वासन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात दिले. या विषयी बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र पाठवावे. तर मी व माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील, असेही ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

निवडक फलक हटवले

गेल्या दोन वर्षांत मुंबई महापालिकेकडून निवडक पोस्टर हटवण्यात आले. तर सत्ताधारी पक्षाचे पोस्टर मात्र तसेच दिसत आहेत, असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात केला आहे. आपण ही बालिश राजकीय स्पर्धा बाजूला ठेवून, सर्व राजकीय पक्षांनी बेकायदेशीर पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग्ज न लावण्याचा निर्णय घेतला, तर नागरिकांना आपण मोठा दिलासा देऊ शकतो. यामुळे आपली शहरे स्वच्छ दिसतीलच, शिवाय आपल्या कार्यकर्त्यांनाही अशा खर्चातून दिलासा मिळेल. जगात कुठेही असे राजकीय पोस्टर लावले जात नाहीत.

वर्षभरात २३ हजार राजकीय फलक हटवले मुंबई महापालिकेच्या अनुज्ञापन विभागाने गेल्या वर्षभरात तब्बल ६५ हजार २६७ अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग, भित्तीपत्रके हटवली आहेत. यात राजकीय, व्यावसायिक, धार्मिक फलकांचा समावेश आहे. यामध्ये तब्बल २३ हजार ७४७ फलक राजकीय स्वरुपाचे होते. या आकडेवारीवरून अनधिकृत फलकांमध्ये सर्वाधिक राजकीय फलक असल्याचे आढळून आले आहेत.