मुंबई : भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर अदानी कंपनी मुंबईला गिळायला निघाली आहे. मुंबईकर कर भरत असतानाही सर्वाधिक फायदा अदानीला मिळत आहे. भाजप सरकार मुंबईतील सगळ्या जमिनी अदानीच्या घशात घालत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणतेही नवीन कंत्राट अदानीला दिले जात आहे. कराचा ओझा मुंबईकरांवर आणि जमीन अदानीला हा कुठचा न्याय, अशी टीका शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी येथे केली.

देवनार येथील कचरा भूमीची (डंम्पिंग ग्राऊंड) जागा अदानीला दिली जाणार आहे. ती जागा स्वच्छ करून देण्यासाठी दोन-अडीच हजार रूपयांची निविदा काढली जाणार आहे, या मुद्द्यावरून ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्ला चढविला.

सरकारचे महापालिकेला आदेश

अदानी समूह म्हणजेच भाजप सरकार आहे. धारावीच्या विकासासाठी बाजारभावापेक्षा दहापट कमी दराने कुर्ला येथील मदर डेअरीचा भूखंड अदानीला दिला जाणार आहे. त्याशिवाय काही महिन्यांपूर्वी देवनारचे डंपिंग ग्राऊंड राज्य सरकारने धारावी पुनर्विकासासाठी दिले होते. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर धारावीतील लोकांना नेऊन ठेवणार होते, पण शहराचा कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न पालिकेला पडल्यानंतर त्यांनी विरोध केला होता, असे ठाकरे म्हणाले.

पालिकेचा विरोध झुगारून हा भूखंड तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने अदानीला दिला होता. पण तीच जागा राज्य सरकारने महापालिकेला परत घेण्याचे आदेश दिले आहेत. ती जागा स्वच्छ करून अदानीला देण्यात येणार आहे. जागेच्या स्वच्छतेसाठी दोन-अडीच हजार कोटी लागले तरी ते वापरा आणि ती जागा अदानीला द्या, असे आदेश देण्यात आले.– आदित्य ठाकरे, आमदार, शिवसेना (ठाकरे)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray criticizes adani over deonar land mumbai news amy