मुंबई : मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर केंद्रावर आलेल्या मतदारांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरून नाराजी व्यक्त केली. दुपारी १.३० च्या सुमारास त्यांनी समाजमाध्यमांवर ध्वनिचित्रफितीद्वारे निवडणूक आयोगाला आवाहन केले. मतदान केंद्रावर पंखे, पिण्याचे पाणी, सावली आदी सुविधा नसल्यामुळे मतदार मतदान न करता परत जात आहेत. निवडणूक आयोगाने मतदारांना मदत करावी, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे म्हणून निवडणूक आयोगाने गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली होती. त्यानुसार मुंबईकर मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले आहेत. परंतु त्यांना मतदान केंद्रावरील गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे, असे आवाहन ठाकरे यांनी सोमवारी दुपारी केले.

हेही वाचा…अग्निरोधक प्रणाली न लावणाऱ्या इमारतींवर कायदेशीर कारवाई करा, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश

मतदान केंद्रात आलेल्या अनेक मतदारांना उन्हात उभे राहावे लागत होते. तेथे सावली, पंखे, पाणी याची सुविधाच नव्हती. उष्णता प्रचंड वाढत असताना मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आयोगाने त्यांना मदत करावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले. याबाबतीत आम्ही नागरिकांना काहीही मदत करू शकत नाही, मदत केली तर आमच्यावर खटले दाखल होतील. ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असून आयोगाने यात लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मतदानासाठी जाताना मोबाइल न्यायचा की नाही, घड्याळ घातले तर चालेल की नाही, असेही प्रश्न मतदारांना पडले आहेत. हा गोंधळ शेवटच्या क्षणी होत असल्यामुळे याबाबत स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray criticizes polling station conditions urges election commission to address voter inconveniences mumbai print news psg