शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदार तसेच युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे बेस्ट बस सेवा आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे बेस्टला अर्थसहाय्य करण्याची मागणी करणारं पत्र पाठवलं आहे. या पत्रात आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की मुंबईची जीवनवाहिनी आणि मुंबईकरांचा अभिमान असलेली ‘बेस्ट’ बससेवा आर्थिक अडचणीत आहे. परंतु तिला पूर्वी मान्य केलेले आर्थिक सहाय्य करायला मुंबई महानगरपालिकेने नकार दिल्याची माहिती मिळाली आहे. पालिकेने असं न करता मुंबईच्या जीवनवाहिनीला संकटातून बाहेर काढावं.

आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे, लाखो मुंबईकरांना दररोज इच्छित स्थळी पोहोचवणारी जगातील सर्वात स्वस्त आणि आधुनिक आरामदायी बससेवा अशी ‘बेस्ट’ची ओळख होती. तिच्या आधुनिकीकरणासाठी, इंधन बचतीसाठी आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस आणण्याची संकल्पना राबवण्याचे कार्य माझ्या हातून होऊ शकले याचा मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांच्या काळात मुंबईच्या या बससेवेकडे प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे असे जाणवले. आर्थिक अडचणीत आलेली बससेवा कोलमडून पडण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम मुंबईकरांच्या जीवनमानावर होणार आहे.

ST employees, ST employees Diwali,
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्यास टाळाटाळ
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Nashik State Transport Department will run extra bus during diwali
दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा
Ratan Tata Will Tito dog
Ratan Tata Will: रतन टाटांनी १० हजार कोटींची संपत्ती सोडली, इच्छापत्रात श्वानाचीही केली सोय; नोकर, भाऊ-बहीण, शंतनू नायडूचाही उल्लेख
Nashik Central, Nashik West, Thackeray group, Dr. Hemlata Patil
नाशिक मध्य, नाशिक पश्चिम अखेर ठाकरे गटाकडे; डॉ. हेमलता पाटील बंडखोरीच्या तयारीत
The position taken by the Court and Chief Justice Dhananjay Chandrachud
घ्यायला हवी तिथे कणखर भूमिका घेतली नाही, यासाठी सरन्यायाधीशांना लक्षात ठेवायचे का?
MVA joint press conference
MVA Seat Sharing : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटला? रमेश चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
Sudhir Gadgil Sangli, BJP nominated Sudhir Gadgil,
निवडणूक लढणार नाही अशी घोषणा करणाऱ्या गाडगीळ यांनाच भाजपची पुन्हा संधी

आमदार ठाकरे यांनी म्हटलं आहे, जर मुंबई महानगरपालिका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणसारख्या (MMRDA) संस्थेला आर्थिक सहाय्य करु शकते, तर ‘बेस्ट’ बस सेवेलाही आर्थिक सहाय्य मिळायलाच हवे! याबाबत आमच्या आपणासमोर काही मागण्या आहेत, ज्यांचा तातडीने आणि गांभीर्याने विचार केला जावा.

१. बेस्ट सेवेला मुंबई महानगरपालिकेने आर्थिक सहाय्य करावे.
२. बेस्टची भाडेवाढ केली जाऊ नये.
३. बेस्ट कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार आणि पेन्शन मिळत राहावी, तारीख चुकवली जाऊ नये.
४. बसच्या संख्येतली नियोजित वाढ तातडीने अंमलात आणली जावी.

हे ही वाचा >> विधानसभा जागावाटपाला लोकसभा निकालाचा आधार? काँग्रेस किमान ८४ जागा लढण्याची शक्यता

वरील सर्व मागण्या या मुंबईकरांचा प्रतिनिधी म्हणून मी आपणासमोर मांडत आहे. मुंबईकरांसाठी महत्वाच्या असलेल्या ‘बेस्ट’ बससेवेचे खच्चीकरण केले जाऊ नये, अशी आमची इच्छा आहे. मिंधे राजवटीचा ‘बेस्ट’ बससेवा संपवून त्यांच्या कुठल्या कंत्राटदार मित्रांच्या खासगी सेवेला चालना देण्याचा डाव नसेल, तर आपण वरील सर्व मागण्या तातडीने पूर्ण कराल आणि मुंबईकरांची ‘बेस्ट’ संकटातून बाहेर काढाल, अशी आशा आहे.