मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईमधील अनेक भागात कचऱ्याचे ढिग साचू लागले असून त्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी तातडीने ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे.

हेही वाचा >>> मुंबई: तस्करी प्रकरणात ३० वर्षांनी आरोपीला ताब्यात घेणे भोवले; अटकेचे आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मुंबईमध्ये अनेक भागात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिग साचू लागल्याच्या तक्रारी गेल्या तीन महिन्यांपासून नागरिक करीत आहेत. मुंबईमध्ये कोणत्याही भागात नियमित कचरा गोळा करण्याचे काम करण्यात येत नाही. मुंबईतील कचरा वेळीच उचलावा. नागरिकांच्या हितासाठी कारवाई करावी, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे. सध्या महानगरपालिका राज्य सरकारच्या बिल्डर आणि कंत्राटदार मित्रांसाठी काम करीत आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. गेले वर्षभर मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी नाहीत. महानगरपालिकेतील १५ सहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत मुंबईतील नागरिकांनी तक्रार कुठे करायची, असा सवाल त्यांनी पत्रात केला आहे. समाज माध्यमांवरील तक्रारीना तीच तीच उत्तरे मिळतात, प्रत्यक्षात कोणतेही काम होताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

Story img Loader