शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज Screen च्या सुवीर सरन यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. वरळी मतदारसंघ, तिथल्या समस्या, तिथल्या लोकांच्या मागण्या, वरळी मतदारसंघाची खासियत या सगळ्यावर आदित्य ठाकरे भरभरुन बोलले आहेत. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेंना त्यांच्या लग्नाबाबत, ब्रेक अपबाबत प्रश्न विचारण्यात आले. या सगळ्यावर आदित्य ठाकरे यांनी खुमासदार उत्तरं दिली आहेत. वरळी मुंबईचं हृदय आहे. या ठिकाणी चाळीचं आयुष्य कसं असतं, गणपती उत्सव कसा साजरा होतो त्यावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं आहे. ही मुलाखत लाइव्ह पाहण्यासाठी क्लिक करा या लिंकवर-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा