अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभादरम्यान नृत्य करतानाच तेजस ठाकरे यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरू भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. या टीकेला आता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांसह राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आशिष शेलार यांच्या टीकेबाबतही विचार विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, ज्यांच्याकडे भाजपासुद्धा लक्ष देत नाही, त्यांच्या टीकेला मी उत्तर देणार नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा – मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अटक

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“आशिष शेलार यांना मानसिकदृष्ट्या मदतीची गरज आहे. त्यांच्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. त्यांच्याकडे भाजपासुद्धा लक्ष देत नाही. त्यामुळे मी त्यांच्या टीकेवर बोलणार नाही”, असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं. “आमची आणि अबांनी कुटुंबीयांची तीन पिढ्यांची मैत्री आहे. आमचे परिवारीक संबंध आहेत आणि लग्नात डान्स करण्यात काहीही चुकीचं नाही”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

आशिष शेलारांनी नेमकी काय टीका केली होती?

दरम्यान, आशिष शेलार यांनी तेजस ठाकरे यांच्या व्हिडीओवरून ठाकरे गटावर टीका केली होती. “जो मराठी तरुण “गोविंद रे गोपाळा” म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही.. ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत. जो होळीला “आयना का बायना..” म्हणताना कधी दिसला नाही. “गणा धाव रे… मला पाव रे..” म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही.. तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला…!”, असं आशिष शेलार म्हणाले होते.

पुढे बोलताना, “हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात “धकधक” झाले. असो.. हे नृत्य पण कसे “जगविख्यात, गरजेचे आणि जीवनावश्यक..वगैरे वगैरे आहे, हे आता त्या तरुणाचे “संजयकाका” महाराष्ट्राला पटवून देतीलच…!”, अशा टोलाही त्यांनी लगावला होता.