अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासंदर्भातील विषयावरुन सध्या प्रमुख सत्ताधारी पक्ष असणारा शिवसेना आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपा आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपाने मुंबईमधील सोमय्या मैदानावर आयोजित केलेल्या बुस्टर सभेमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर आंदोलनामधील शिवसेनेच्या सहभागासंदर्भात प्रश्न उपस्थित करत टीका केली होती. आपण ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी पाडली तेव्हा तिथे उपस्थित होतो पण शिवसेनेचा एकही नेता किंवा शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता असा दावा फडणवीस यांनी जाहीर सभेमधून केलाय. या दाव्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना उत्तर दिलेलं असतानाच राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांवर खोचक शब्दांमध्ये टीका केलीय.
नक्की पाहा हे फोटो >> ‘सरड्यासारखे रंग’, ‘सुपारी’, निवांत सभा अन् नक्कल करत म्हणाले “काय एकदाचं…”; अजित पवारांची राज ठाकरेंविरोधात टोलेबाजी, बॉडीगार्ड्सही लागले हसू
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा