मुंबई : मुंबईची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी यापुढे पावसावर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा नि:क्षारीकरण प्रकल्प हाच चांगला पर्याय आहे, असे मत आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. आताच्या राज्य सरकारने रद्द केलेला हा प्रकल्प आमचे सरकार आले की आम्ही पुन्हा आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर गारगाई धरण प्रकल्प पूर्ण करणे अशक्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेतर्फे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पोलिटिकल टाऊन हॉल’अंतर्गत एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चगेटच्या इंडियन मर्चंट चेंबरमध्ये झालेल्या या चर्चासत्रात वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर आपली मते मांडली. यावेळी त्यांनी मुंबईच्या पाणीपुरवठ्याविषयी भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, मुंबईची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा नि:क्षारीकरण प्रकल्प आमच्या सरकारच्या काळात हाती घेतला होता. मात्र आताच्या सरकारने हा प्रकल्प रद्द केला. अनेक मोठ्या देशांमध्ये नि:क्षारीकरण प्रकल्पातूनच पाणी मिळवले जाते. त्यामुळे नि:क्षारीकरण प्रकल्प हा चांगला पर्याय आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही हा प्रकल्प पुन्हा मार्गी लावू, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

aaditya thackeray (1)
Ladki Bahin Yojana: “निवडणुकीनंतर २१०० रुपये का? आधीच का नाही दिले?” आदित्य ठाकरेंचा सत्ताधारी महायुतीला सवाल!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Belapur vidhan sabha election
गावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे मोठे आव्हान; ऐरोली, बेलापूरमध्ये उमेदवारांची कसरत
Narendra Modi Slams Uddhav Thackeray
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला, “राहुल गांधी ज्या दिवशी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतील तेव्हा…”
devendra fadnavis in kalyan east assembly constituency election
कल्याण : विषय संपल्याने रडारड करणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी रहा; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
Mumbai First Aditya Thackeray, Aditya Thackeray,
मुंबईच्या विकासासाठी महापालिका, महापौरांना अधिक अधिकार हवेत, ‘मुंबई फर्स्ट’च्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांची भूमिका
Extravagance of one lakh crores by rulers party in state Priyanka Chaturvedis allegation
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून एक लाख कोटीची उधळपट्टी, ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा आरोप
Deepak Kesarkar challenge increased due to rebellion from BJP
लक्षवेधी लढत: सावंतवाडी : बंडखोरीमुळे केसरकरांच्या आव्हानात वाढ

हेही वाचा >>>‘महिला आणि हवामान बदलावरील जनतेच्या मागण्यांची सनद’; राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आवाहन

गारगाई धरण प्रकल्पासाठी पाच लाख झाडे कापावी लागणार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारच्या काळात मुंबई महापालिकेने हा प्रकल्प बाजूला ठेवून नि:क्षारीकरण प्रकल्प राबवण्याचे ठरवले होते. मालाड मनोरी येथे नि:क्षारीकरण प्रकल्प उभारून त्यातून २०० ते ४०० दशलक्ष लीटर पाणी मिळवणे शक्य होणार आहे. मात्र सत्तापालट झाल्यानंतर गारगाई धरण प्रकल्पाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली होती. तर नि:क्षारीकरण प्रकल्पासाठीही मुंबई महापालिकेने वर्षभरात निविदा प्रक्रिया राबवली होती. मात्र प्रतिसाद न आल्यामुळे ही निविदाच रद्द करण्यात आली. या प्रकल्पाची पुनर्निविदा काढण्यात येणार होती. मात्र आचारसंहितेमुळे हा विषय मागे पडला.

हेही वाचा >>>मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात तिरंगी लढत; मुस्लिम मते ठरणार निर्णायक

गारगाई धरण प्रकल्प पूर्ण करणे अशक्य..

गारगाई धरण प्रकल्प पूर्ण करणे अशक्य असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. गारगाई धरण प्रकल्पाची चर्चा आपण दहा वर्षांचे होतो तेव्हापासून ऐकत आलो आहोत, असेही ते म्हणाले. या धरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या अनेक परवानग्या लागणार आहेत व त्याकरीता खूप वर्ष लागणार आहेत. तसेच या प्रकल्पासाठी पाच लाख झाडे कापावी लागणार असून तानसा अभयारण्यही बाधित होणार आहे. त्यानंतर हे धरण बांधायला काही वर्ष लागतील. तसेच जलवाहिन्यांचे जाळे उभारण्यासाठी मोठा कालावधी आणि कोट्यवधी रुपये लागतील. एवढे करून दरदिवशी केवळ ४०० दशलक्ष लीटर पाणी मिळू शकणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प व्यवहार्यही नसल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.