गेल्या तीन वर्षांमध्ये वरळी विधानसभा मतदारसंघात हेवा वाटावा अशी प्रगती झाली आहे. म्हणूनच ‘त्यांना’ही वरळीमध्ये यावेसे वाटत आहे, असा टोला युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी पत्ररूपाने संवाद साधताना अप्रत्यक्षपणे भाजपा आणि शिंदे गटाला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- आदित्य ठाकरेंचे शिंदे सरकारला आठ प्रश्न; म्हणाले, “हे खोके सरकार या प्रश्नांचं उत्तर…!”

विधानसेच्या २०१९ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर पर्यावरण मंत्रालयाच्या मंत्रीपदाची सूत्रे त्यांच्या हाती आली. मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी केली आणि महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. बंडखोर आमदारांनी भाजपबरोबर राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर सातत्याने शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. तसेच त्यानंतर भाजपने वरळी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे.

आमदारकीला तीन वर्षे पूर्ण होत आल्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी वरळीतील मतदारांना पत्र पाठवून संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. वरळी विधानसभेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी या पत्राचे वितरण करीत आहेत. या पत्राच्या निमित्ताने जनतेच्या समस्या आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा- आधी आदित्य ठाकरे म्हणाले “…म्हणून टेंडर रद्द केले का?” आता नितेश राणेंचे जशास तसे उत्तर; म्हणाले “उद्धव सेनेतील युवराजांची…”

नवीन बस थांबे, चांगले पदपथ, रस्ते, हिरव्यागार मोकळ्या जागा किंवा सामुदायिक व वैयक्तिक स्तरावर लसीकरण मोहीम आणि इतर समस्येचे निराकरण मतदारसंघातील नागरिकांच्या सहकार्याने करण्यात येत आहेत. त्यामुळे वरळीमध्ये हेवा वाटावा असे विकास काम होत आहे. त्यामुळेच प्रत्येक राजकीय पक्षाला वरळीमध्ये वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे. तसेच या भागात बेकायदेशीपणे बॅनर लावण्यात येत आहेत, असे टोला आदित्य ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटाचा उल्लेख न करता पत्रातून लगावला आहे.

हेही वाचा- दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे आक्रोश आंदोलन; उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाबाबत धोरण आखण्याची मागणी

जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून लोकहिताचा विचार करणारे सरकार पाडण्यात आले. पण ते आम्हाला निःस्वार्थपणे काम करण्यापासून आणि नागरिकांची सेवा करण्यापासून रोखू शकणार नाहीत. आम्ही तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करतच राहू, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray taunts bjp and shinde group while communicating with voters of worli assembly constituency by letter mumbai print news dpj