देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीनंतर भाजपाने राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनावर शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपासमोर नैराश्य असल्याने ते अशाप्रकारे वागत आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

माध्यमांशी बोलाताना आदित्य ठाकरेंनी सांगितलं की, “मी कुठल्याही न्याय प्रक्रियेवर किंवा पोलीस प्रक्रियेवर फार काही बोलत नाही. भाजपाची आरोप करण्याची सवय आहे. आम्ही त्यावर उत्तर देत नाही आम्ही काम करतो. आम्ही कुठल्याही यंत्रणेला प्रचार यंत्रणा म्हणून वापरत नाही जसं केंद्र सरकारकडून होतं. जी काही न्याय प्रक्रिया असते ती आम्ही पुढे नेत असतो, मी त्यावर कुठलही बाकीचं वक्तव्य करणार नाही. भाजपासमोर नैराश्य असल्याने ते अशाप्रकारे वागत आहेत.”

What Uddhav Thackeray Said About Raj Thackeray ?
Uddhav Thackeray : “राज ठाकरेंशी युती करणं शक्यच नाही, महाराष्ट्र द्रोही..”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
uddhav thackeray replied to devendra fadnavis dharmayudhha criticism
“आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला!
Aditya Thackeray Dapoli, Aditya Thackeray talk on Hindutva, Uddhav Thackeray,
उद्धव ठाकरे हे घरी एकच असतात व बाहेर देखील एकच असतात – आदित्य ठाकरे
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
Uddhav Thackeray Speech in Ausa Latur
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”
sushma andhare on uddhav thackeray bag checking
उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्याच्या मुद्द्यावरून सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या; म्हणाल्या, “जर तुम्ही…”

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांचं पथक सागर बंगल्यावर दाखल

तसेच, “मला वाटतं एक आपण बघणं गरजेचं आहे की, कोविड अद्याप आपल्यातून गेलेला नाही आकडे कमी झालेले आहेत, पण आपण काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त गोष्टी उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे. रेस्टॉरंट, दुकानं हे सगळं उघडलेलं आहे. सगळ्यांनी काळजीपूर्व वागावं मास्क जिथे जिथे शक्य आहे तिथे घालावा. सगळ्या महत्वाचं म्हणजे लसीकरण पूर्ण करून घ्यावं जे बुस्टरसाठी पात्र असतील त्यांनी बुस्टर डोस घ्यावा.” असंही आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं.