मुंबई : राज्यातील विविध भागात कोसळणारा मुसळधार पाऊस, त्यामुळे वारंवार खंडित होणार वीजपुरवठा, सेतू कार्यालयातून कागदपत्रे मिळण्यास होणारा विलंब आदी विविध कारणांमुळे कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी २२ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> वाघ तीन लाख तर बिबट्या दीड लाख…वन्य प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना

सीईटी कक्षाने कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या बी.एस्सी कृषी, बी.एस्सी उद्यानविद्या, बी.एस्सी वनविद्या, बी.एफएस्सी मत्स्यशास्त्र, बी.टेक अन्न तंत्रज्ञान, बी.टेक जैवतंत्रज्ञान, बी.टेक कृषी अभियांत्रिकी, बी.एस्सी सामुदायिक विज्ञान, बीएस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा नऊ शाखांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार १५ जुलैपर्यंत अर्ज नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र मुसळधार पाऊस, सेतू कार्यालयातून विद्यार्थांना कागदपत्रे वेळेवर मिळण्यास होणारा विलंब यामुळे अर्ज नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत त्यांना २२ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच पहिली प्रवेश यादी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती सीईटी कक्षाच्या कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी दिली.

हेही वाचा >>> अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुन्हा चुकला; बुधवारपासून शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा नवा अंदाज

प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक

– प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज व कागदपत्रे अपलोड करणे – २२ जुलै

– अंतरिम गुणवत्ता यादी : २६ जुलै (सायंकाळी ५.३० वा.)

– यादीवर हकरत व तक्रार नोंदणी : २७ ते २९ जुलै

– तक्रारींची यादी प्रसिद्ध : ३० जुलै (सायंकाळी ५.३० वा.)

– अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : ३१ जुलै (सायंकाळी ५.३० वा.)

– पहिली प्रवेश यादी : ४ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा.)

– प्रवेश घेण्याचा कालावधी : ५ ते ७ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० पर्यंत)

– दुसर्या फेरीची यादी : ११ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० नंतर)

– प्रवेश घेण्याचा कालावधी : १२ ते १४ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० पर्यंत)

– तिसर्या फेरीची यादी जाहीर : १९ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा.)

– प्रवेश घेण्याचा कालावधी : २० ते २२ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा.)

– महाविद्यालयात कागदपत्रे व आवश्यक शुल्क भरण्याचा कालावधी : २० ते २३ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा.)

– केद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा तपशिल जाहीर : २४ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा.)

– महाविद्यालयस्तरावर प्रवेश फेरी : २ ते ११ सप्टेंबर

– महाविद्यालयाचे वर्ग सुरू होणार : २६ ऑगस्ट

– प्रवेश प्रक्रिया संपणार : ११ सप्टेंबर

पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मुदतवाढ नीट-एमडीएस-२०२४ या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या अर्ज नोंदणीसाठी १५ जुलैपर्यंत मुदत दिली होती. मात्र नोंदणीचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अर्ज नोंदणीसाठी मंगळवारी सकाळी दोन दिवसांची मुदतवाढ जाहीर केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना १७ जुलै रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. १८ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. १९ जुलै रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. त्यानंतर प्रथम प्रवेश यादी १९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Admission date for agriculture course extended mumbai print news zws
Show comments